मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठीवरील ‘बस बाई बस ‘ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना विविध राजकीय, अराजकीय प्रश्न विचारण्यात आले. पंकजा मुंडेंनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली. मी कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायली लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही, “मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘झी मराठी’च्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रम सध्या चांगलाच रंगतदार होताना दिसत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या होत्या.
https://twitter.com/zeemarathi/status/1557705391093362688?s=20&t=vSNs2ZWFETqdOFFxAyRYdg
या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या, यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले. या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंनी विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी कार्यक्रमातील एका खेळादरम्यान पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो पाहताच त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना तुम्हाला काय बोलायचे ते बोला, असे सांगितले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर टाकायला नको होतं.
https://twitter.com/zeemarathi/status/1557716914700312576?s=20&t=vSNs2ZWFETqdOFFxAyRYdg
या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना सुबोध भावेने राजकीय स्थितीबद्दल एक प्रश्न विचारला. दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू.” पंकजा मुंडेंच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे. कोणकोणते आमदार फोडले, असा प्रश्न विचारल्यावर ‘नमिता मुंदडा, सुरेश धस’ अशी यादीच पंकजांनी सांगितली.
https://twitter.com/Pankajamunde/status/1557952763140587521?s=20&t=vSNs2ZWFETqdOFFxAyRYdg
BJP Leader Pankaja Munde On College Propose and other Questions
Politics Zee Marathi TV Show BusBaiBus Entertainment