मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर छापा; FBIला सापडल्या या धक्कादायक बाबी

by Gautam Sancheti
ऑगस्ट 13, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
donald trump

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात गेल्या काही दिवसांपासून सीबीआय, ईडी सह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या वतीने दिल्ली राज्य सरकारचे मंत्री,तसेच पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू मधील राजकीय नेते असो की वरिष्ठ अधिकारी यांच्या घरावर तसेच बेनामी मालमत्तेवर छापे टाकण्यात येत आहेत. असाच प्रकार सध्या अमेरिकेत देखील सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी आता मोठी खुलासा झाला आहे. एफबीआयनं आण्विक कागदपत्रांसह इतर वस्तूंच्या शोधात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने हा मोठा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयनं तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स ताब्यात घेतले होते. इतकंच नाही तर एफबीआयच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, ट्रम्प घरी नसताना हे छापे मुद्दाम टाकण्यात आले होते. ट्रम्प यांच्या उपस्थितीचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांना होती.

तसेच, ट्रम्प या छापेमारीचा फायदा आपल्या राजकीय फायद्यासाठीही करु शकतात, अशीही शक्यता अधिकाऱ्यांना होती. त्यामुळेच ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत छापेमारी करण्यात आली होती. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर फ्लोरिडामध्ये आणलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकृत कागदपत्रं शोधण्यासाठी एफबीआयनं छापेमारी केल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. सध्या न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिलं प्रकरण आणि कागदपत्रं हाताळण्यासंदर्भातील दुसरं प्रकरण, यासंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेनं या प्रकरणात ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.

FBI च्या मते, एजन्सी प्रेसिडेंशियल रेकॉर्ड्स अॅक्ट आणि वर्गीकृत साहित्य हाताळणी कायद्यांच्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करत आहे. नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने 2022 मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे 15 बॉक्स जप्त केले. हे बॉक्स ‘मार-ए-लागो’ला (डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्लोरिडातील निवासस्थान) पाठवले गेले. त्यावेळी NARA ने सांगितलं की, नियमांनुसार कागदपत्रांनी भरलेले हे बॉक्स ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा नॅशनल आर्काइव्हजला पाठवायचे होते.

ट्रम्प यांनी FBI च्या छाप्याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी फ्लोरिडातील पाम बीचवर असलेल्या ‘मार-ए-लागो’वर छापा टाकून निवासस्थान ताब्यात घेतलं होतं. ट्रम्प म्हणाले होते, “ही आपल्या देशासाठीची काळी वेळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. हा प्रकार म्हणजे, न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखे आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

USA Ex President Donald Trump Home FBI Raid
Search Operation Nuclear Documents Weapons

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खडाखडी सुरू! नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले हे गंभीर आरोप

Next Post

कॉलेजला असताना कुणी प्रपोज केलं का? दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडले का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FZ8HDbnaIAA69zs

कॉलेजला असताना कुणी प्रपोज केलं का? दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडले का? पंकजा मुंडे म्हणाल्या...

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011