India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येत्या १ ऑगस्टपासून बदलणार हे नियम; बघा, तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुलै महिना संपत आला आहे. अवघ्या चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होईल. येत्या १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी नियम बदलले जाणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत नव्याने ठरवण्यात येणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या नियमांत काही बदल करण्याची शक्यता आहे. या बदलांचा जनसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे.

१ ऑगस्टपासून वेगवेगळे नियम बदलण्यात येतील. दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅसच्या किंमती ठरवण्यात येतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून हे भाव कमी जास्त होऊ शकतात. सरकारी तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवतात. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच बँक ऑफ बडोद्याचे धनादेशाचे नियम १ तारखेपासून बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक करणार आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल अॅपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी ही पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी २०२० पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सिस्टिममुळे ५०,००० आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, SMS, बँकेचे मोबाईल अॅप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.

ऑगस्ट महिन्यात एकूण १८ दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात मोहरम रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी असे महत्वाचे सण आहेत. यादिवशी बँकेचे कामकाज बंद असेल. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शटर डाऊन असेल. सगळ्या प्रकारच्या सुट्यांचा विचार करता, ऑगस्ट महिन्यांत बँकांना एकूण १८ दिवस सुट्टी असेल.

Big Changes form 1 August What are those see it Economics Cheque LGP Banking Finance


Previous Post

लग्नानंतर ७ वर्षांनी गरोदर राहिली, एकाच वेळी दिला तब्बल पाच बाळांना जन्म; पण…

Next Post

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसा निमित्त महाआरती (व्हिडीओ)

Next Post

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसा निमित्त महाआरती (व्हिडीओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group