मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रशीद शेख यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम एका तरुणाला जीवदान देणारा ठरला. या कार्यक्रमातून तब्बल दहा लाखांचा वर जमा झालेला निधी मालेगावच्या सलामताबाद भागात राहणाऱ्या शेख इनायत या तरुणाच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी देण्यात आला. हलाखीची परिस्थिती असलेल्या इनायत यास शस्त्रक्रियेसाठी तब्बल आठ लाख रुपयांची आवश्यकता होती. माजी आ.रशीद शेख यांच्या नागरी सत्काराप्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी एक लाख रुपये किंमतीची चांदीची तलवार त्यांना भेट दिली.
क्षणाचा विलंब न करता तलवार त्यांनी या तरुणाच्या शस्त्रक्रियेसाठी दिली. मात्र त्यातून त्याचा शस्त्रक्रियेचा खर्च भागणार नव्हता. शेख यांचे सुपुत्र माजी आ.आसिफ शेख यांनी हा तलवारीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन मिनिटांचा अवधी देत त्या तलवारीची बोली लावली. बघता बघता या तलवारीला ३ लाख ५१ हजार रुपयांची बोली लागली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ही तलवार भेट देण्यात आली. त्यांच्या तलवारीला सात लाख रुपये मिळाले आणि त्यांनी देखील तो निधी हा तरुणांच्या शस्त्रक्रियेसाठी दिला. आणि व्यासपीठावर या तरुणाला त्या रकमेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. एकंदरीत राजकीय नेत्यांना मिळालेल्या या वस्तू स्वरूपातील भेटीतून ऐका सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे आयुष्य मात्र त्याला चांगल्या प्रकारे जगण्यास त्यामुळे मदत झाली.
Bidding Silver Swords Malegaon
NCP Program Rashid Shaikh