नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सय्यद पिंपरी य़ेथील शेताच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन महिन्याच्या पिल्लूला स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने बाहेर काढले. थंडीत कुडकुडत असलेल्या या पिल्लाला उब देऊन त्यानंतर त्याच्या आईची भेट घडवून आण्यासाठी त्याला एका छोट्या खड्यात टोपलीत ठेवले. त्यानंतर ४० मीनिटाने या बिबट्याची आई या ठिकाणी आली व तीने आपल्या बाळाला नेले. मायलेकाची ही भेट मात्र स्थानिकांना थंडीतही एक वेगळी उब देऊन गेली. येथील शेतकरी दीपक शांताराम ढिकले यांच्या शेतातील विहीरीत हे पिल्लू पडले होते. मायलेकाची भेट झाल्यामुळे त्यांनाही आनंद झाला.