मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे–देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; अमित शहांबरोबर बैठक, काय चर्चा होणार?

by Gautam Sancheti
डिसेंबर 14, 2022 | 11:52 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shinde Shah Fadanvis e1682495513912

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळानेदेखील तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी या प्रकरणावर मध्यस्थी करण्याची आणि तोडगा काढण्याची विनंती केली होती.

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गुजरातला गेले होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे – फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन तणाव सुरु झाल्यानंतर बोम्मई आणि शिंदे यांच्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीत सीमावादावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नाही. तसेच, शिंदे आणि बोम्मई यांच्या भेटीवर चर्चांना उधाण आल्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर उद्या अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा
सीमावादावरुन महाविकास आघाडीदेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकार गप्प असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी येत्या १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.

CM Shinde DYCM Fadanvis Delhi Tour Meeting
Amit Shah Politics Maharashtra Karnataka Border Issue

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे वाह…विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लूची अशी झाली आईची भेट (बघा व्हिडिओ)

Next Post

वीज बील ऑनलाईन भरल्यास मिळतेय एवढी सवलत; ८ लाख ग्राहकांनी घेतला लाभ, तुम्हीही घ्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Electricity Bill scaled e1660320760516

वीज बील ऑनलाईन भरल्यास मिळतेय एवढी सवलत; ८ लाख ग्राहकांनी घेतला लाभ, तुम्हीही घ्या

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011