India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भुसावळचा ‘घाशीलाल वडा’ आहे खुपच प्रसिद्ध; तुम्ही खाल्ला आहे का?

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in राज्य
0

 

भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खवय्यांसाठी आज एक खुसखुशीत बातमी आहे. त्यातही वडापावच्या शौकिनांना आज आम्ही भुसावळच्या घाशीलाल वड्याविषयी सांगणार आहोत. रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या भुसावळ येखून मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे रेल्वेमार्ग जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. परंतु तेथे आणखी एक आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे तो म्हणजे घाशीलालचा वडापाव होय.

हा वडापाव केवळ तेथील स्थानिक नागरिक, रेल्वे प्रवासीच खात नसून जगभरातील पर्यटक देखील पार्सल म्हणून घेऊन जातात, अशी त्याची प्रसिद्धी आहे. वडापाव हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्य पदार्थ. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ अनेकांच्या रोजच्या धावपळी मध्ये सहज पोटाची भूक शमवतो. सध्या पाच ते दहा रुपयांमध्ये रोडवर मिळणारा वडापाव मोठ्या हॉटेल्स मध्ये शंभर रुपयामध्ये देखील विकला जातो.

मुंबईचा वडापाव हा प्रसिद्ध आहे तसेच नाशिक, सिन्नर, मनमाड, इगतपुरी, वाई आणि पुणे येथील देखील वडापाव प्रसिद्ध मानला जातो. मुंबईचा वडापाव लोकप्रिय आहे. जगभरातील लोकांना वडापावने वेड लावले आहे. अनेक लोकांनी या पदार्थामध्ये अनेक बदल केले आहेत. याचे बरेच प्रकार आपण दररोज पाहतो. परंतु आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण आवडीने खाऊ शकतो.

वडापाव हा मुंबईकरांचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे पण या वडापावची ख्याती फक्त मुंबई पुरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण देशभर पसरली आहे. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात एक असाच लोकप्रिय वडापाव आहे, घाशीलाल वडापाव होय. भुसावळची ओळख ही रेल्वे आणि विज प्रकल्पामुळे असली तरी भुसावळच्या या वड्याची चव न्यारी आहे. भुसावळ शहराच्या मध्यभागी असणारा ‘घाशीलाल वडा’ हा पंचक्रोशी मध्ये खास आहे.

विशेष म्हणजे हा गरम गरम वडा खाण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. सध्याचे हे दुकान मूळ मालकाची पाचवी पिढी चालवत आहे. पाचवी पिढी आज हा कारभार सांभाळत असली तरीही या वड्याची चव मात्र बदललेली नाही. या ठिकाणी सकाळपासून सुरु झालेली भट्टी ही रात्री उशीरापर्यंत सुरू असते. आजही दुरून येणारी पाहुणे मंडळी एकदा तरी या ठिकाणी वड्याची चव घेण्यासाठी येतात.

Bhusawal Famous Ghashilal Vada Specialty


Previous Post

LICच्या या प्लॅनमध्ये दररोज भरा २३८ रुपये, नंतर मिळतील तब्बल ५४ लाख रुपये

Next Post

पत्नीला ‘दूध देणारी गाय’ मानणे ही क्रूरताच; उच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी

Next Post

पत्नीला 'दूध देणारी गाय' मानणे ही क्रूरताच; उच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group