India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाकावाटे कोरोनाची लस घ्यायची आहे? मोजावे लागतील एवढे पैसे

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंजेक्शन ऐवजी नाकावाटे लशीला भारतात परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या ‘इन्कोव्हॅक’ या नाकावाटे दिली जाणारी लस आता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे. आणि आता या लशीची किंमतही जाहीर करण्यात आली आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लशी इंजेक्शनद्वारे देण्यात येतात. भारत बायोटेकने तयार केलेल्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ लसीच्या प्रतीक्षेत अनेक जण होते. नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लशीला केंद्र सरकारने मंजुरी दिली असली तरी ती सुरुवातीला फक्त खासगी रुग्णालयातच उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र आता शासकीय रुग्णालयात देखील ती लस माफक दरात सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. नागरिकांना ही लस विकतच घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या या करोना प्रतिबंधात्मक नेझल लशीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. इन्कोव्हॅक या लसीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. या लशीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. त्यामुळेही लस साधारणतः १ हजार रुपयाला मिळू शकते. तसेच सरकारी रुग्णालयात या लशीची किंमत ३२५ ते ३५० रुपये आकारण्यात येणार आहे.

सध्या चीनसह अन्य देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भारताने कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने याच अनुषंगाने करोनाच्या नेझल लसीला परवानगी दिली. ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. तसंच ही लस सर्वप्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. ज्या व्यक्तींनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना ही लस उपलब्ध होईल.

तसेच इन्कोव्हॅक ही लस १८ वर्ष आणि त्यावरील नागरिकांना देण्यात येणार आहे. या लसीचे दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्रत्येकी चार थेंब टाकायचे आहेत. तसेच २८ दिवसांनंतर लसीची दुसरा डोस घ्यावा लागणार असल्याचे आरोग्य सेवा कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
करोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे संपुर्ण भारतासाठी हा चिंतेचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासना कडून सातत्याने आव्हान केले जात आहे.

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीचे भरपूर फायदे आहेत. करोनाचा विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे ही लस नाक आणि श्वसन मार्गाचे रक्षण करते. नेझल लस आजपासून CoWIN ॲपवर उपलब्ध झाली आहे. CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करून नेझल लसीसाठी नोंदणी करू शकता. ही लस सर्वात आधी खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल आणि जानेवारी महिन्यापासून या लशीला सुरुवात होईल, त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे.

Bharat Biotech Nasal Vaccine Price Declared
Covid Corona Incovacc


Previous Post

खासदार नवनीत राणांनी संजय राऊतांना दिले हे खुले आव्हान

Next Post

…तर फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत; भाजप नेत्यानेच दिला घरचा आहेर

Next Post

...तर फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत; भाजप नेत्यानेच दिला घरचा आहेर

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group