मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजवरच्या राज्याच्या इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मुंबईला आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारलेल्या रमेश बैस यांची राज्यपाल भवनात भेट घेतली. त्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणारी ठरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्य असो वा मुंबईकरांबद्दल काढलेले अवमानजनक शब्द असो, कोश्यारी कायम चर्चेत राहिलेत. १२ आमदारांची यादी त्यांनी अडवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. सत्तासंघर्षादरम्यान त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचेदेखील काहींनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावर कार्यशैलीवर ताशेरे ओढले. अशात कोश्यारी तब्बल सहा दिवस मुंबई येथील राजभवनात राहणार आहेत.
कोश्यारी मुंबईत येत नाही तोच त्यांच्याविरुद्ध कोल्हापूर तसचे इतर शहरांमध्ये आंदोलनदेखील सुरू झाले आहे. यादरम्यान कोश्यारींनी रमेश बैस यांना राजमंत्र दिल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. भगतसिंग कोश्यारी जे आजपासून २१ तारखेपर्यंत मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. १७ मे २० मे दरम्यान त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोश्यारी राजभवनात सहा दिवस मुक्काम करणार असल्याने नेमकी खेळी काय? राज्यपाल काही धडे देणार आहेत का? यासंबंधी चर्चांना उत आला आहे.
वादग्रस्त ठरलेली विधाने
– गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही.
– समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?
– नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत
– ‘शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत’
https://twitter.com/maha_governor/status/1658400390759739393?s=20
Bhagat singh Koshyari Rajbhavan Governor Ramesh Bais