इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – यंदा देशभरात सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडविला आहे. महाराष्ट्रात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता बंगळुरूत पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे अनेक रस्ते पाण्यात आहेत. त्यामुळे जनजूवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच, आयटी हब समजल्या जाणाऱ्या या शहरात आयटी कंपन्यांची कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
https://twitter.com/gautyou/status/1566621281608671232?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
बंगळुरू शहरात पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले असून वाहने पाण्यात गेली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक आयटी कंपन्यांचे देखील या पाऊस आणि पुरामुळे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाले ओव्हरफ्लो झाले असून अनेक ठिकाणी गाड्याही अडकल्या आहेत. शहरात गुगल, अॅडोब आणि इन्फोसिस, विप्रोसह अनेक दिग्गज आयटी कंपन्या आहेत. त्यांना प्रचंड फटका बसत आहे. बंगळुरुमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
https://twitter.com/hey__goku/status/1566745360235565056?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
एका आकडेवारीनुसार, आयटी कंपन्यांकडून सरकारला सुमारे ६४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. हा आकडा साधारणपणे कर्नाटकच्या जीडीपीच्या २५ टक्के एवढा आहे. या कंपन्यांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील जनतेचे सरासरी उत्पन्न अधिक आहे. मात्र, आता कर्नाटकातील पावसामुळे याच आयटी कंपन्यांना २२५ कोटी रुपयांचा फटका सबला आहे. पावसामुळे येथील लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेही कठीण झाले आहे.
https://twitter.com/Ananth_IRAS/status/1566823919868207104?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
विशेष म्हणजे कर्नाटकातील पावसाचे फोटो आणि व्हिडिओ यामध्ये दुचाकीव चारचाकी गाड्यांपेक्षा अधिक जेसीबी दिसत आहेत आणि ऑटोची जागा ट्रॅक्टरने घेतल्याचे दृष्य आहे. काही जण चक्क ट्रॅक्टनेच ऑफिसात जाताना दिसत आहेत. सध्या पावसाचा सर्वाधिक फटका बेलांदूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, आउटर रिंग रोड आणि BEML लेआउटला बसला आहे. यापूर्वी, ३० ऑगस्टला शहरात मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तसेच, आता पुन्हा ९ सप्टेंबरपर्यंत कर्नाटकात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
https://twitter.com/HNandan23/status/1566720126388699136?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
मुसळधार पावसामुळे बंगरुळूत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने वेगाने कार्य हाती घेतले तरी ते तोकडे पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहनं पाण्याखाली गेली आहेत. रहिवासी भागात पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेकांची घरे जलमय झाली आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे दिसत आहे. तसेच पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे बंगळूरु शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कर्नाटक सरकारकडून बचावकार्य सुरू असून, पुरात अडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारकडे देखील मदतीची मागणी करण्यात येत आहे.
https://twitter.com/gautyou/status/1566624420931981312?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
Bengaluru Very Heavy Rainfall Flood Viral Videos