इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या आणखी एका घटनेमुळे चर्चेत आहेत. एरवी ते स्वतःच्याच विधानांमुळे किंवा उपक्रमांमुळे चर्चेत असतात, पण यावेळी त्यांच्या भावाच्या पराक्रमामुळे ते वादात अडकले आहेत. पण धीरेंद्र शास्त्री यांनी आपला त्या घटनेशी कुठलाही संबंध नसून ज्याचे तो भोगेल, असे स्पष्ट केले आहे.
धीरेंद्र शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी आव्हान दिले होते. चमत्कार करून दाखवा मी पैसे देतो, असे श्याम मानव म्हणाले होते. त्यानंतर देशात धीरेंद्र शास्त्री नावाचीच चर्चा होऊ लागली. अनेक हिंदू संघटना शास्त्री यांच्या पाठिशी उभ्या झाल्या. तर श्याम मानव यांच्यासोबतही अनेक लोक उभे झाले. पण ते प्रकरण शाब्दीक चकमकीतच संपुष्टात आले. मात्र धीरेंद्र शास्त्री हे नाव सर्वांना माहिती झाले. त्यामुळे ते कुठेही काहीही बोलले तरी त्याची चर्चा होते. आता मात्र त्यांच्या भावानेच त्यांना अडचणीत आणले आहे.
एक व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ दिसत आहे. त्याच्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात सिगारेट दिसत आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून धीरेंद्र शास्त्री यांना टारगेट केले जात आहे. त्यांनी मात्र आपण असत्यासोबत नाही, जो करेल तो भरेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच या प्रकरणाचा आपल्याशी संबंध जोडू नये, असेही म्हटले आहे.
भावावर गुन्हा
शास्त्री यांचा भाऊ या व्हिडियोमध्ये दादागिरी करताना दिसत आहे. त्याच्यावर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भावावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जे सत्य आहे ते पुढे आले पाहिजे. आम्ही कायम सत्यासोबत आहोत. हा प्रकार आमच्यासोबत जोडला जाऊ नये, असे बागेश्वर शास्स्त्री म्हणाले.
फक्त बागेश्वर धामचे गाणे वाजणार
या व्हिडियोमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचे बंधू बुंदेलखंडचे लोकनृत्य चालणार नाही, असे लोकांना म्हणताना दिसत आहे. इथे फक्त बागेश्वर धामचेच गाणे वाजणार असे म्हणत तो तेथील लोकांना मारहाण करतानाही दिसत आहे. पण लोकांनी बागेश्वर धामचे गाणे वाजविण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
https://twitter.com/bageshwardham/status/1628060074483793921?s=20
Bageshwar Dham Dhirendra Shastri after brother FIR