मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने सेल्फी काढण्यास नकार दिल्यामुळे झालेली मारहाण तसेच गाडीची तोडफोड या प्रकरणाने आता ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल सानिया गिल हीने केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पृथ्वी शॉवरच उलटणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सेल्फी वादानंतर पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव याच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. त्याबद्दल ओशिवरा पोलिसांनी आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये सपना गिलचाही समावेश होता. पृथ्वी शॉने चौथ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद उफाळल्याचे सांगण्यात येत होते. पण आता सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केले आहेत. आपण पृथ्वी शॉला सेल्फी घेण्यासाठी विचारणाच केली नव्हती. आम्ही कोणालाही मारहाण केली नाही, पैसेही मागितले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले. आम्ही पार्टीचा आनंद घेत होतो, त्यामुळे माझ्या एका मित्राने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राने माझ्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे मी तिथे गेले आणि त्यांना थांबवले. पुरावा म्हणून माझ्या मित्राने व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी (पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र) मला बेसबॉलने मारहाण केली. त्यापैकी एक किंवा दोन तरुणांनी मला मारले आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली, असे गंभीर आरोप सपना गिलने केले आहेत.
प्रायव्हेट पार्टला लावला हात
आम्ही त्यांना विमानतळावर रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला गोळा करत घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी आमची माफीही मागितली. पण १६ फेब्रुवारीला त्यांनी माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे, असे कळाले. त्यामुळे मीही २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली, असेही सपना गिल म्हणाली.
Cricketer Prithwi Shaw Selfie Sania Gill Serious Allegation