रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्या राम मंदिर निर्माण समितीमध्ये होणार मोठा बदल; हे आहे कारण

by India Darpan
जुलै 10, 2021 | 5:51 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Ayodhya ram temple

चित्रकुट (उत्तर प्रदेश) – अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर निर्माण प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागला असला तरी यातील अनेक अडथळे समोर येत आहेत.विशेषत: जमीन खरेदी प्रकरण तसेच मंदिराच्या बांधकामसंबंधी वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्ष घातले असून मंदिर निर्माण समितीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत यापुढे अडचणी येऊ नयेत म्हणून नवीन आणि विश्वासू पदाधिकाऱ्यांवर काही बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात येईल. कारण अलीकडेच अयोध्या मंदिर जमीन प्रकरणामुळे वादात आलेल्या मंदिर बांधकाम समितीबद्दल संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत. चित्रकूटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संघाच्या चिंतन बैठकीत श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील संबंधाबद्दलही चर्चा सुरू आहे.
ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांच्यासमवेत बैठकीत जमीन खरेदीच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे.  मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत यापुढे कोणतीही अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे, कारण यासाठी काही जुन्या लोकांना बांधकामाच्या जबाबदारीतून मुक्त करून नवीन लोकांना विश्वासात घेतले जाऊ शकते. संघाच्या चिंतन बैठकीत मुख्य विषयांवर चर्चा केली जात आहे.  यात अयोध्येत अखंडपणे भव्य मंदिराचे बांधकाम प्रथम आणि प्राधान्य क्रमावर ठेवले आहे.
अनेक राज्यातील अन्य प्रमुख मंदिरांच्या देखभाल व तेथे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भातही एक चौकट तयार करण्यात येत आहे.  इतकेच नाही तर मठ आणि मंदिरांमध्ये मालमत्तेबाबत वारंवार होणाऱ्या वादांबद्दलही संघाने चिंता व्यक्त केली आहे.  मठ आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबतही या बैठकीत चर्चा होत आहे.  यासाठी संघ प्रमुख संतांचा सल्लाही घेणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, १२ तालुक्यात रुग्णसंख्या १०० च्या आत

Next Post

TCSची मोठी घोषणा! वर्षभरात कॅम्पसमधून देणार नोकर्‍याच नोकऱ्या

Next Post
साभार - webstockreview

TCSची मोठी घोषणा! वर्षभरात कॅम्पसमधून देणार नोकर्‍याच नोकऱ्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011