रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

TCSची मोठी घोषणा! वर्षभरात कॅम्पसमधून देणार नोकर्‍याच नोकऱ्या

by India Darpan
जुलै 10, 2021 | 6:07 am
in मुख्य बातमी
0
साभार - webstockreview

साभार - webstockreview


विशेष प्रतिनिधी, मुंबई 
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने मोठी घोषणा केली आहे. या वर्षभरात टीसीएस कॅम्पस सिलेक्शनला अधिकाधिक चालना देणार आहे. याद्वारे कंपनी तब्बल ४० हजार जागा भरणार आहे. त्यामुळे खासकरुन इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दीड ते दोन वर्षापासून केवळ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय नव्हे तर उच्च शैक्षणिक संस्था आणि अनेक विद्यापीठ देखील बंद आहेत. त्यामुळे तरुणांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान होत असून बेरोजगारी वाढत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्या नसल्याने नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसने एक सुखदवार्ता जाहीर केली आहे. येत्या वर्षभरात टीसीएसकडून सुमारे ४० हजार नोकर्‍या उपलब्ध होतील, असे टीसीएसने जाहिर केले आहे.

tcs

टीसीएसचे जागतिक मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड म्हणाले की, कोविड -१९ साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात अनेक अडचण आल्या. तरीही गेल्या वर्षी एकूण ३.६० लाख नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातक कंपनी अशी टीसीएसची ओळख आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून ४० हजारांपेक्षा जास्त युवकांची भरती करेल. टीसीएसमध्ये सध्या पाच लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. खाजगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पसमधून ४० हजार पदवीधरांची भरती केली होती. यावेळीही भरती अधिक जास्त व वेगवान होईल, असेही ते म्हणाले.
 गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून भरती झालेल्या दोन हजार इंटर्नर्सपेक्षा ही कंपनी चांगली कामगिरी बजावेल, असे त्यांनी सांगितले. तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, भारतातील तरुणांमध्ये कौशल्य आणि प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही. त्यांच्या बद्दलच्या चिंतांशी ते सहमत नाहीत. त्यांनी भारतीय तरूणांचे अभूतपूर्व कौतुक केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्या राम मंदिर निर्माण समितीमध्ये होणार मोठा बदल; हे आहे कारण

Next Post

प्रा.गिरीश सी.पाटील यांच्या कवितेचा गुजरात पाठ्यपुस्तकात समावेश

Next Post
IMG 20210710 WA0003

प्रा.गिरीश सी.पाटील यांच्या कवितेचा गुजरात पाठ्यपुस्तकात समावेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011