सप्तशृंगीगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर श्री भगवती अर्थात सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला (दि.26) प्रारंभ झाला. आज सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या मुहूर्तावर सुमारे २५ -३० हजार भाविकांनी गडावर हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. व श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी लिन झाले. आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगड येथे सप्तशृंगी देवीचा अश्विन नवरात्रोत्सवातील दुसऱ्या माळेची पूजा कळवणचे आमदार नितीन पवार, सौ. जयश्रीताई पवार व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड.श्री. ललित निकम यांच्या हस्ते श्री भगवतीस पंचामृत अभिषेक, महापूजा करण्यात आली. घटस्थापनेच्या विधिवत पूजेने सोमवारी नवरात्र उत्सव यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांसह सर्व ट्रस्ट कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ तथा भाविक उपस्थित होते. दरम्यान आज नवरात्र उत्सव बाबत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यात्रेची आढावा सभा अप्पर जिल्हाधिकारी सौ. माया पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रसंगी विविध विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.