शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आशिया चषक: उद्या पुन्हा रंगणार भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार; असे आहे सुपर4चे वेळापत्रक

सप्टेंबर 3, 2022 | 2:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FbqmhUSakAAGGuS e1662194061151

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अखेर विजय मिळवून आव्हान कायम राखले. भारताकडून पराभूत झालेले पाकिस्तान व हाँगकाँग हे दोन संघ आज मैदानावर उतरले. पण, बाबर आजमच्या संघाने विजय मिळवून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यात सुपर ४ ही नवीन फेरी खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेटमध्ये अनेक सामने रंगतात. परंतु त्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वांचीच उत्सुकता वाढवितो. कारण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. खेळांमध्ये हार किंवा जित ही होतच असते. परंतु भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार याची सर्वांनाच याची नेहमी चर्चा होत असते वास्तविक पाहता हे दोन देश एकमेकांचे राजकीय दृष्ट्या शत्रू जरी असले तरी खेळामध्ये मात्र मैत्रीपूर्ण वातावरण असावे लागते आणि ते निश्चितच दिसून येते.

आशिया चषक २०२२ या फेरीतील अव्वल दोन संघ हे अंतिम फेरीत पोहोचतील. आशिया चषकाच्या अंतिम फेरीचा सामना हा ११ सप्टेंबरला खेळवण्या येणार आहे. हा सामना दुबईच्या स्टेडियममध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार तो संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून पाहायला मिळू शकतो. श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवून सुपर ४ मध्ये एन्ट्री मारली होती.

पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने येत्या रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानला भिडणार आहे. आशिया चषक स्पर्धेवर आतापर्यंत १४ पैकी सर्वाधिक ७ वेळा भारताने वर्चस्व गाजवले आहे. याशिवाय श्रीलंकेने ५ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा जेतेपद पटकावले. बांगलादेशने ३ वेळा अंतिम फेरी गाठूनही अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही.

भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही संघ 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने-सामने आली होती. गेल्या वर्षी याच मैदानावर भारताने टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारची घातक गोलंदाजी यामुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता.

पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँगमध्ये जबरदस्त सामना रंगला होता. पाकिस्तानने आधी फलंदाजी करत हाँगकाँगपुढे 194 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, हाँगकाँगला पाकिस्तानने दिलेल्या आव्हानापर्यंत पोहचता आले नाही. हाँगकाँगला 38 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा पद्धतीने तब्बल 155 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने हा विजय मिळवला.

सुपर 4 चे असे आहे वेळापत्रक
३ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
६ सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
७ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
११ सप्टेंबर- फायनल, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून

Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Super4 Schedule
Cricket

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परीची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; प्रेक्षकांनी केली ही मागणी

Next Post

कोरोना लस घेतल्याने मुलीचा मृत्यूः याचिकाकर्त्यांने सीरमकडे केली एवढ्या पैशांची मागणी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
covid vaccine booster dose

कोरोना लस घेतल्याने मुलीचा मृत्यूः याचिकाकर्त्यांने सीरमकडे केली एवढ्या पैशांची मागणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011