नाशिक – पर्यटन हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. धार्मिक पर्यटन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या भारतात विविध संस्कृतीचे लोक राहतात. त्यामुळे आपल्याकडे धार्मिक पर्यटनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी अनेक पर्यटन संस्था, यात्रा कंपन्या विविध यात्रा आयोजित करतात.
हिंदू संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे कैलास पर्वत, मानसरोवर आणि चारधाम यात्रा. दरवर्षी मोठ्या संख्येने लोकं याठिकाणी जातात. या यात्रांच महत्त्व, त्यांची गरज याविषयी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील विविध सरकारी संस्थेत गिर्यारोहक प्रशिक्षक म्हणून कामाचा अनुभव असलेले तसेच कैलास मानसरोवर यात्रा आणि चारधाम यात्रेचे तज्ञ अश्विन नेगी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मंगळवार दि.०८ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून या विषयावर खास गप्पा मारणार आहोत.