गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अशोका मेडिकोव्हर हास्पिटलमध्ये ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला मिळाले नवजीवन

नोव्हेंबर 17, 2021 | 7:57 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211117 WA0143

डॉ.सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने सक्षमपणे हाताळली ही केस
नाशिक – अशोका मेडीकव्हरच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांच्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला नवीन जीवन दिले आहे. याबाबात हॅास्पिटल प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, सौ. शक्ती सिंग (२७ वर्षे, नाव बदलले) यांना गरोदरपणात अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. वरिष्ठ आणि अनुभवी बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. श्रीकला काकतकर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. प्रणिता संघवी (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. किरण मोटवानी (बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ) आणि डॉ. नेहा मुखी (बालरोगतज्ञ) यांच्या टीमने शौर्या (नाव बदलले आहे) या गर्भधारणेच्या २२ आठवड्यात अकाली जन्मलेल्या मुलीचे प्राण वाचिवले, जन्माच्या वेळी तिचे वजन फक्त ५८० ग्रॅम होते. सौ. शक्ती सिंग सुमारे सहा महिन्यांची गरोदर असताना तिला अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिला गर्भधारणेचे २२ आठवडे पूर्ण झाले होते आणि तिला असह्य वेदना होत होत्या. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर तिची तपासणी करण्यात आली असता असे आढळून आले की तिचे गर्भाशय उघडे होते आणि त्यामुळे प्रसूती पुढे ढकलण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. डॉ. श्रीकला काकतकर (स्त्रीरोगतज्ञ) यांनी अगदी कौशल्याने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली आणि प्रसूतीचा कालवकधी २ आठवड्यांनी पुढे ढकलण्यात त्यांना यश आले. या शस्त्रक्रियेमध्ये उघड्या गर्भाशयाला टाके घालण्यात आले आणि त्यामुळे बाळाला आणि आईला होणारा धोका टळला. नंतर प्रसूती झाली असता ५८० ग्रॅमच्या बाळाचा जन्म झाला.

जन्म झालेल्या बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांचा योग्य विकास झाला नसल्यामुळे जगण्याची शक्यता कमी दिसत होती. बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि डॉ. सुशील पारख आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली प्रगत नवजात शिशु अतिदक्षता विभागात बळावर उपचार करण्यात आले. हे संपूर्ण उपचार ७८ दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी चालले आणि संपूर्ण उपचारादरम्यान अनेक चढ-उतार आले. शेवटी आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले, आता दोघेही सुखरूप असून धोक्याबाहेर आहेत.

बाळ गंभीर परिस्थितीतून मोठ्या यशाने बाहेर पडले
“आम्ही या कोव्हिडच्या काळात आईसह २२ आठवड्यांच्या अर्भकाला वाचवण्यात यशस्वी झालो, आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे. आमच्या सर्व टीमने एकत्रितपणे ध्येय केंद्रित करून दिवस-रात्र काम केले ज्यामुळे आम्हाला आई आणि मुलाचे जीव वाचविण्यात यश मिळाले. आम्ही या कुटुंबाला त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, सर्व अडचणींना तोंड देत हे बाळ गंभीर परिस्थितीतून मोठ्या यशाने बाहेर पडले.
डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ञ

बाळाचे वजन १६०० ग्रॅम इतके झाले
डॉ. सुशील पारख यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु अतिदक्षता विभागात सेवा देणारे अनुभवी कर्मचारी, एका छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धता, या सर्व सुविधांमुळे हे यश मिळेल आहे. आम्ही आनंदी आहोत की बाळाचे वजन लक्षणीय पद्धतीने वाढले आहे आणि आज ते १६०० ग्रॅम इतके झाले आहे.
रितेश कुमार, केंद्रप्रमुख
अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटल

बालकांचा जगण्याचा दर ०.५ टक्के इतका कमी आहे.
“गेल्या काही वर्षांत, अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलने आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा गंभीर केसेस हाताळण्याचे कौशल्य विकसित केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, सुमारे १५ दशलक्ष मुले प्रसूतीच्या पूर्ण कालावधीच्या आधी जन्माला येतात. भारतात, एकूण प्रसूतीपैकी, १ टक्के बाळांचा जन्म २८ आठवड्यांपूर्वी होतो आणि २४ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा जगण्याचा दर ०.५ टक्के इतका कमी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या फ्लाईंग क्लबमध्ये आता वैमानिक प्रशिक्षण; DGCAची मान्यता

Next Post

देवळाली कॅम्प- आईच्या अंतिमयात्रेत मुली झाल्या खांदेकरी; पाचव्या मुलीने दिला अग्निडाग

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20211117 WA0170 1 e1637160067172

देवळाली कॅम्प- आईच्या अंतिमयात्रेत मुली झाल्या खांदेकरी; पाचव्या मुलीने दिला अग्निडाग

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011