India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार टोलमाफी; सुमारे सात लाख भाविक व त्यांच्या वाहनांना लाभ

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in राज्य
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी व त्यांची वाहने जाणार असल्याने या विनंतीकडे श्री. गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पंढरपूर जवळील राष्ट्रीय महामार्ग ९६५ वरील पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे टोल प्लाझा उभारण्यात आला असून त्यावर जून महिन्यापासून टोल वसुली प्रस्तावित आहे. ही टोल वसुली प्रक्रियाच पुढे ढकलण्याबाबत पत्र श्री गडकरी यांना श्री बावनकुळे यांनी लिहिले आहे. जेणेकरून वारकरी व भाविकांना या राष्ट्रीय महामार्गाचा सुलभतेने वाहतुकीसाठी उपयोग करता येईल. भाविकांना या मार्गावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही व अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

यात्रेसाठी राज्य शासन व स्थानिक प्रशासनासह विविध विभागांकडून जय्यत तयारी करण्यात येते. भाविकांना कोणतिही अडचण होणार नाही यासाठी नागरिक व संस्था देखील मदतीला येतात. वारकरी व संबंधित संस्थानी प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे टोल संदर्भात विनंती केली. त्याची प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत श्री गडकरी यांना पत्र लिहिले.

• महाराष्ट्राची परंपरा आषाढ वारी
आषाढी यात्रा ही महाराष्ट्राची परंपरा असून राष्ट्रीय महामार्ग ९६५ हा वारी मार्गावर आहे. या मार्गावरून लाखो वारकरी भाविक श्री विठ्ठल रुखमाई्च्या दर्शनासाठी वारी यात्रेच्या माध्यमातून प्रवास करतात. सुमारे सात लाख भाविक व त्यांची वाहने येथून जाणार आहेत. त्या सर्वांना दिलासा मिळावा यासाठी हे पत्र श्री. बावनकुळे यांनी लिहिले.

Ashadhi Vari Toll Exemption Varkari Relief


Previous Post

नाशकात युवकांना ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पो पावला…. २ दिवसात ८५० जणांना बड्या कंपन्यांची नोकरी

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नातील प्रथा

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - लग्नातील प्रथा

ताज्या बातम्या

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

June 8, 2023

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

June 8, 2023

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

June 8, 2023

बिहारमध्ये पूल कोसळला त्याच कंत्राटदाराकडे महाराष्ट्रातील हे काम

June 8, 2023

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बायको आलिया या व्यक्तीच्या प्रेमात? चर्चांना उधाण

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group