इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अरुणाचल प्रदेशातील बोमडिला येथे आज लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. वैमानिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही तवांग परिसरात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये उपचारादरम्यान पायलटचा मृत्यू झाला होता.
संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी 9.15 च्या सुमारास अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ ऑपरेशनल सॉर्टी दरम्यान, आर्मी एव्हिएशनच्या चित्ता हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. हेलिकॉप्टर बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ क्रॅश झाल्याचे नंतर समजले. वैमानिकांच्या शोधासाठी लष्कराकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
Arunachal Pradesh: Indian Army helicopter crashes near Mandala hills, search ops for pilots underway
Read @ANI Story | https://t.co/3b9rpWhSUT#ArunachalPradesh #HelicopterCrash #IndianArmy #MandalaHills pic.twitter.com/b2kvT0cbX3
— ANI Digital (@ani_digital) March 16, 2023
गेल्या वर्षीही अपघात
गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत असताना क्रॅश झाले होते. या अपघातात लष्कराचे दोन पायलट जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तवांगच्या फॉरवर्ड एरिया, जेमिथँक सर्कलच्या बाप टेंग कांग फॉल्स क्षेत्राजवळील न्यामजांग चू येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास नियमित उड्डाण करताना हा अपघात झाला. दोन वैमानिकांसह हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून नित्यनेमाने येत होते.
अपघाताची माहिती मिळताच मदत बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर दोन गंभीर जखमी वैमानिकांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले हेत्. दोन वैमानिकांपैकी एक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हेती. तवांगमधील हेलिकॉप्टरचा हा पहिला अपघात नव्हता. 2017 मध्ये, वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर क्रॅश होऊन पाच IAF क्रू मेंबर्स आणि दोन आर्मी ऑफिसर ठार झाले होते.
Army Helicopter Crash in Arunachal Pradesh Pilot Missing