India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गोदावरीचे वाढते प्रदूषण हे मोठ पाप ; छगन भुजबळ यांचा विधीमंडळ सभागृहात हल्लाबोल… अखेर मुख्यमंत्री म्हणाले…

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी शुद्धीकरण करण्यासाठी शासनाकडे अॅक्शन प्लॅन तयार तयार असून एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून डीपीआरला मान्यता देण्यात येईल. अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी स्वच्छतेच्या बाबत आज आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला. या लक्षवेधी सूचनेवर ते म्हणाले की, त्र्यंबकेश्वर नदी पात्रात गेल्या काळात मोठ्या प्रमाणात काँक्रीटचे बांधकाम करण्यात येत होते. याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. त्यानंतर हे काम काही प्रमाणात थांबले आहे. मात्र हे काम पूर्ण बंद होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नदीचे नैसर्गिक स्त्रोत पूर्णपणे बंद होत आहे. तसेच गोदावरी नदीपात्रात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात मलजल सोडण्यात येते. त्यामुळे पाणी अतिशय दुषित होत असल्याकडे लक्ष वेधले.

ते म्हणाले की, नाशिक मध्ये गोदावरी नदी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण अतिशय वाढले आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक हे धार्मिक ठिकाण आहे. याठिकाणी जगभरातून भाविक येतात आणि येथील जल घेऊन जातात. मात्र आज येथील पाणी अतिशय दुषित झाले आहे. रामकुंडात तर जे भाविक पाय धुण्यासाठी उतरतात त्या पाण्यात तर रक्त शोषून घेणारे कीटक आढळले आहेत. भाविकांच्या पायाला या किड्यामुळे इजा देखील पोहचत आहे. याठिकाणी नियमित स्वच्छता देखील केली जात नाही. तसेच येथील एसटीपी प्लांट अतिशय जुने झाले असून तेथे पाण्याचे कुठलेही शुद्धीकरण होत नाही ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे या मलजल प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात यावेत. तसेच आयआयटी सारख्या संस्थेची मदत घेऊन येथील सत्य परिस्थितीचा अहवाल तयार करून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली.

ते म्हणाले की, या ठिकाणी स्मार्ट सिटीची सुशोभिकरणाची कामे करण्यात येत आहे. ती कामे तर होण्याची आवश्यकता आहेच. मात्र सर्वप्रथम गोदावरी शुद्ध होण्याची गरज आहे. कारण याठिकाणी येणारे भाविक अतिशय श्रद्धेने येतात आणि याठिकाणी असलेल्या दुषित पाण्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होतो. हे मोठ पाप आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले…
दरम्यान यावरील उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी स्वच्छतेबाबत हरित लवादाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर १ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. याठिकाणी सुमारे १.८ एमएलडी सांडपाणी तयार होते. यासाठी शासनाच्या वतीने १.९ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगरोन्थान योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. तो पर्यंत प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणत होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक मनपाच्या एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. शासनाकडे गोदावरी स्वच्छतेबाबत अॅक्शन प्लॅन तयार असून अमृत योजनेच्या माध्यमातून डीपीआरला लवकरच मान्यता देण्यात येऊन केंद्र व राज्य यांच्या संयुक्ताने हा प्रकल्प राबविण्यात येईल. तो पर्यंत नदीपात्रात प्रक्रिया करूनच पाणी सोडण्यात येऊन प्रदूषणाला आळा घालण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

Godavari Pollution Assembly Session CM Shinde Chhagan Bhujbal


Previous Post

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले… पायलट बेपत्ता.. बचावकार्य सुरू…

Next Post

मराठा आरक्षण लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे उत्तर…

Next Post

मराठा आरक्षण लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे उत्तर...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group