India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लोकसभेचं ठरलं! ठाकरे गटाला सर्वाधिक तर काँग्रेस लढवणार एवढ्या जागा; ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला किती?

महाविकास आघाडीचे ठरले लोकसभेसाठीच्या ४८ जागांची जुळवाजुळव झाली

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीची रणनीती महाविकास आघाडीने निश्चित केली आहे. या अंतर्गत राज्यातील ४८ जागांसाठी जुळवाजुळव झाली असून या अंतर्गत ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तेस्थापनेसाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी पुढेदेखील कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळात आघाडीने काही निवडणुका सोबत लढल्या. त्यानंतर ही आघाडी कायम ठेवायची की नाही, यासंदर्भात शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. परंतु, या सर्व शंका बाजूला सारत महाविकास आघाडीने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:चा फॉर्म्युला घोषित केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.

असे आहे जागावाटप
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यामधील मुंबईतील ०६ लोकसभा जागांपैकी ०४ जागा ठाकरे गट लढवेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १-१ जागा लढवणार असल्याची माहिती आहे.

पाच ते सहा जागांवर अद्याप अनिश्चितता
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ पैकी ५ ते ६ जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केला आहे.भाजपने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

आज पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे, विरोधी पक्षनेते मा.अजित पवार जी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे 'मविआ' च्या जिल्हाप्रमुखांसमवेत संयुक्त बैठक पार पडली,त्या बैठकीस उपस्थित होतो. pic.twitter.com/KGgYiCkpAf

— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 15, 2023

Mahavikas Aghadi Politics Loksabha Election Seat Sharing


Previous Post

२२ व्हिडिओ क्लीप, ३ व्हॉईस नोटस… तब्बल १ कोटी लाचेची ऑफर… अमृता फडणवीस यांच्या तक्रारीने खळबळ

Next Post

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले… पायलट बेपत्ता.. बचावकार्य सुरू…

Next Post

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले... पायलट बेपत्ता.. बचावकार्य सुरू...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group