इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही क्रीडा प्रकारातील खेळाडूला कधीतरी निवृत्त व्हावी लागते. मग तो सचिन तेंडुलकर असो की आणखी फुटबॉल मधील एखादा खेळाडू. सध्या जगभरात फुटबॉलचा फिव्हर सुरू आहे. त्यातच फिफा वर्ल्ड कपकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच आता अर्जेंटिनाचा फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे जगभरातील फुटबॉल आणि मेसी चाहते हादरले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेस्सीने अर्जेंटिनासाठी आतापर्यंत ४ वर्ल्डकप खेळले आहेत. त्याने सन २००५ मध्ये राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले होते. मेस्सीने १६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अर्जेंटिनाच्या सिनिअर संघाकडून त्याने ९० गोल केले आहे. तो फिफा वर्ल्डकप बाबत फार उत्सुक होता, अर्थात यासाठी मी थोडा काळजीत देखील आहे. माझा अखेरचा वर्ल्डकप कसा असेल. माझी इच्छा आहे की सर्व काही चांगले होवो.
अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र अंतिम सामन्यात लिओनल मेसी याने स्वतः स्पष्ट केले की, दि. १८ डिसेंबर रोजी फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून कायमची निवृत्ती घेणार आहे. उपांत्य सामन्यात मेसीने पेनल्टीमध्ये गोल केला आणि स्वतःच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. या सामन्यात जूलियन अल्वारेजने देखील दोन अप्रतिम गोल केल आणि अर्जेंटिनाने क्लोएशियाला 3-0 अशा अंतराने पराभूत केले.
या विजयानंतर मेसीने जाहीर केले की, विश्वचषकाचा अंतिम सामना म्हणेजे अर्जेंटिना संघासाठी त्याचा शेवटचाच सामना असेल. मेसी पुढे म्हणला की, “संघ अंतिम सामन्यात पोहोचवू शकल्यामुळे मी आनंदी आहे. अंतिम सामन्यात मी देशासाठी शेवटचाच सामना खेळणार आहे आणि हा प्रवास इथेच संपेल. पुढच्या विश्वचषकाला अजून खूप वर्ष आहेत आणि मला नाही वाटत की, मी पुढच्या विश्वचषकात खेळू शकेल.
सध्या मेसी हा ३५वर्षांचा आहे आणि त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा ३५ वा फिपा विश्वचषक आहे. त्याने अर्जेंटिनाचे दिग्गज डिएगो माराडोना आणि डेवियर माशेरानो यांना मागे टाकले आहे. या दोघांनीही आपल्या संघासाठी चार विश्वचषक खेळले आहेत. यावर्षीच्या विश्वचषकात सहभागी झाल्यानंतर मेसीने या दोघांचा विक्रम मोडीत काढला. मेसीने सध्याच्या विश्वचषकात आतापर्यंत पाच गोल केले आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत गेब्रियल बितिस्तुता याला मागे टाकले आहे.
अर्जेंटिना संघ यावर्षी सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मेसाचा हा शेवटचा सामना असल्यामुळे संघ विजेतेपदासाठी सर्व ताकतीने प्रयत्न करेल, असेच सध्या दिसत आहे. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना फ्रांस आणि मोरक्को यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकले, तो अंतिम फेरीत जाईल. योगायोग म्हणजे हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचाही शेवटचा सामना असणार आहे.
सन २०१४ मध्ये अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकप जिंकण्याची संधी होती. त्या वर्ल्डकपमध्ये मेस्सीची कामगिरी शानदार झाली होती आणि अर्जेंटिना अंतिम फेरीत देखील पोहोचली होती. पण जर्मनीने त्यांचा पराभव केला आणि विजेतेपद मिळवले होते. परंतु मेस्सीला वर्ल्डकप जरी जिंकता आला नसला तरी मोठ्या स्पर्धेत त्याची कामगिरी शानदार झाली आहे. २०१४ वर्ल्डकप, कोपा अमेरिका २०१५ आणि २०२१ मध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याला मिळाला होता. सन २०१४च्या वर्ल्डकपमध्ये मेस्सीने चमकदार कामगिरी केली होती. त्याला ४ वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता.
Lionel Messi: "On Sunday, I will play my last World Cup match." pic.twitter.com/JPkxMgfTNs
— SPORTbible (@sportbible) December 14, 2022
Argentina Football Captain Lionel Messi Big Announcement
FIFA World Cup Retirement