India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र भुसे; अशी आहे नवी कार्यकारिणी

India Darpan by India Darpan
May 18, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स असोसिएशन, वैराज कलादालन, राका काॅलनी, नाशिक संस्थेच्या २०२३ – २०२५ द्विवार्षिक कालावधीसाठी संस्थेच्या अध्यक्षपदी इंजि. नरेंद्र भुसे व सचिवपदी इंजि. राजेंद्र बिर्ला तसेच उपाध्यक्ष आर्कि. शीतल चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. दि. १८ मे २०२३ रोजी, वैराज कलादालन येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात याची घोषणा करण्यात आलेली आहे.

संस्थेची नवी कार्यकारिणी अशी
खजिनदार – इंजि. राजेंद्र पवार,
सहसचिव – आर्कि. नकुल भावसार,
कार्यकारिणी सभासद – इंजि. सचिन मोरे, आर्कि. मनोज गुप्ता, इंजि. हर्षद भामरे, आर्कि. अंकित मोहबंसी, इंजि. मनिष नवपारीया व आर्कि. योगेश महाजन
स्वीकृत सदस्य – इंजि. अमित सानप, आर्कि. सौ. मंजिरी मोहबंसी, इंजि. सौ. कांचन गडकरी, इंजि. स्मृती ठाकुर, इंजि. अनिल कठपाल, आर्कि. अजित कुलकर्णी, आर्कि. मृणाल गरुड

वरील सर्व निवड बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून पूर्व अध्यक्ष इंजि. योगेश कासारपाटील यांनी काम पाहिले. माजी अध्यक्ष आर्कि. चारूदत्त नेरकर व माजी सचिव आर्कि. किरण राजवाडे यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांचा ऊहापोह केला, तसेच माजी खजिनदार आर्कि. शैलेश रकीबे यांनी त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक अहवाल सादर केला.

संस्थेच्या पुढील कार्यकाळात विविध सेमिनार, कार्यशाळा, व्याख्याने, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष इंजि. नरेंद्र भुसे यांनी सभासदांना दिली. या सर्व साधारण सभेत प्रथितयश व मान्यवर आर्किटेक्ट्स व इंजिनिअर्स यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, नाशिक संस्थेचे राज्य स्तरीय पदाधिकारी आर्कि. प्रविण पगार, आर्कि. प्रदीप काळे, असोसिएशन ऑफ कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअर्स, इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्षपदी इंजि. विजय सानप, वेस्ट झोनचे अध्यक्षपदी इंजि. पुनीत राय आणि प्रॅक्टिसिंग व्हॅल्यूअर असोसिएशन, इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्षपदी इंजि. सुनील भोर व खजिनदारपदी आर्कि. अंकित मोहबंसी, त्याच बरोबर संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष डाॅ. सुनील कुटे हे सार्वजनिक वाचनालय, नाशिक, संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि आर्कि. सचिन गुळवे यांची नाशिक सिटीझन फोरम च्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, या सर्वांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंजि. राजेंद्र बिर्ला यांनी केले.

Architect and Engineers Association Nashik New Body


Previous Post

लाचखोर डीडीआर सतीश खरेवर राज्य सरकारची मोठी कारवाई; ३० लाखांची लाच घेणे भोवले

Next Post

अभिनेत्री दीपिका कक्करला गरोदरपणात सतावतोय हा आजार; तिनेच दिली ही माहिती (व्हिडिओ)

Next Post

अभिनेत्री दीपिका कक्करला गरोदरपणात सतावतोय हा आजार; तिनेच दिली ही माहिती (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

हे पहा, भाजप नेत्यांवर शिंदे-फडणवीस सरकार मेहेरबान! तब्बल ५५० कोटी मंजूर

June 5, 2023

बापलेकाने आधी पैसे घेतले… फ्लॅट तर दिलाच नाही… परस्पर तिसऱ्याला विकला… असे झाले उघड

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

‘माझ्या मागे गुंड लागले आहेत’, असा मेसेज केल्यानंतर दोन तासातच आढळला तापी नदीत मृतदेह

June 5, 2023

पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरसाठी हालचाली गतिमान; MSRDCने घेतला हा निर्णय

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रेल्वे अपघातात सरकारी भरपाईबरोबरच मिळतील इतके लाख… फक्त खर्च करा अवघे ३५ पैसे… अशी आहे प्रक्रिया

June 5, 2023

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group