दिसपूर – मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आसाममध्ये आता नागरिकांना दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही अशी घोषणा केली आहे. पण, या घोषणेमुळे लगेच योजनांचा लाभ बंद होणार नाही. तर त्याची अंमलबजावणी हळूहळू करण्यात येणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, राज्याच्या हातातील योजनांमध्ये दोन अपत्यांची अट असेल. त्यानंतर हळूहळू राज्यातील सर्व योजनांसाठी ही अट लागू करण्यात येणार आहे.यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरण सुरू झाले आहे. कर्जमाफी असो वा अन्य सरकारी योजना, लोकसंख्या प्रमाण विचारात घेतले जाईल. चहा बाग कामगार, एससी-एसटी समुदायास ही योजना लागू होणार नाही. भविष्यात लोकसंख्येचे निकष शासकीय लाभासाठी पात्रता म्हणून विचारात घेतले जातील.
सरमा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाला गती दिली आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी आसाममधील तीन जिल्ह्यांतील अल्पसंख्यांकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंबंधी काही सूचना दिल्या होत्या.
https://twitter.com/ANI/status/1406443450442997769?s=20