नवी दिल्ली – सध्याकाळात आधार कार्डची गरज प्रत्येक सरकारच्या कामांमध्ये दिसून येते. कारण ते सर्वात महत्वाचे दस्तऐवज असून यूनीक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) ते जारी केले आहे, त्यातून वापरकर्त्यांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते.
यूआयडीएआयच्या वतीने आधारसह अनेक सेवा देखील प्रदान करण्यात येतात. ऑनलाइन पोर्टलद्वारे आपला आधार क्रमांक खरा आहे की नाही ? हे आपण तपासू शकता. ही सेवा अनेकदा कर्मचार्यांची ओळख पडताळण्यासाठी वापरली जाते. कोणीही नोंदणीच्या वेळी किंवा आधार अद्ययावत करताना दिलेला ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर पडताळणी करू शकतो.
आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे. जर मोबाईल क्रमांक आधारसह नोंदणीकृत नसेल तर वापरकर्त्यास आपल्या जवळच्या स्थायी आधार केंद्राला भेट द्यावी आणि तेथे आधार क्रमांक वास्तविक आहे की नाही हे ओळखावे.
याकरिता खालील टप्पे आहेत.
1: अधिकृत आधार वेबसाइट – uidai.gov.in या लिंकवर जा आणि ‘आधार सत्यता सेवा निवडा.
2: आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) प्रविष्ट करा.
3: दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा आणि पाठवा ओटीपी वर क्लिक करा.
4 : व्हीआयडीसाठी नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल.
5 : जर आपला आधार क्रमांक बरोबर असेल तर नाव, राज्य, वय, लिंग इत्यादी तपशिलासह आधार नंबरसह एक नवीन पृष्ठ उघडेल.
6: आधारशी लिंक केलेले मोबाइल नंबर ईमेल पत्त्याद्वारे किंवा जवळच्या स्थायी आधार केंद्रावर पडताळणी केली जाऊ शकते.