मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून अंकाई किल्ला परिसरात दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
अनेक दिवसांपासून अंकाई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत होती. पर्यटक देखील या ठिकाणी येण्यास घाबरत होते. या संदर्भात परिसरातील रहिवाशांनी व अलकेश कासलीवाल यांनी वन विभागाचे आरएफओ अक्षय मेहत्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यानंतर पिंजरे लावण्यात आले होते.
दरम्यान अंकाई किल्या शेजारीच लागून असलेल्या वंजारवाडी शिवारात जाधव वस्ती जवळ बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे स्थानिक शेतकरी रहिवासी यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.