इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी परदेश दौरे आणि उत्पन्नाचे स्त्रोत सांगावे असे सांगत टीका केली होती. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी मी लंडनहून १७ तारखेला मुंबईला परत येत आहे. TV9 ला विनंती की मी माझा पासपोर्ट, ३ वर्षाच्या ITR रिटर्न्स च्या कॅापीज घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे. होऊन जाऊ दे असे थेट चॅलेंज दिले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकत आव्हान दिले आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवारांचे राम आणि श्याम (अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण, मी मुंबईत परत आले आहे. तुमच्या मालकांना (अजित पवारांना ) निरोप द्या, आज माझा पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत व इनकम टैक्स रिटर्न्स घेऊन येते, कुठे व कधी दाखवू ते कळवा. आणि हो, येतांना आपल्या १० पास अर्थ मंत्र्यांनी त्यांचे उत्पन्न कसे व कुठून येते त्याचाही तपशील आणायला सांगा. वेळ कळवली नाहीत तर दुपारी ४ वाजता मी माझ्या राहत्या घरून प्रेस कांफ्रेंस घेईन.
या अगोदर गुलाबी जैकेट वरुन टीका
या अगोदर दमानिया यांनी अजित पवार यांच्या गुलाबी जैकेट वरुन टीका केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जैकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो.
त्यानंतर सूरज चव्हाण यांनी टीका केली होती. त्यानंत दमानिया यांनी त्यांनी मिस्टर सूरज चव्हाण. तुम्ही आणि तुमचे मालक अजित पवार काय आहात ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि मी किती तत्त्वावर जगते ते देखील पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, आणि हो, तुमच्या मालकाला देखील माहित आहे, त्यांना विचारा. दोष तुमचा नाही, तुमच्या भ्रष्ट विचारसरणीचा आहे. तत्त्वावर लोक कशी जगतात ते तुम्हाला कळणे शक्य नाही. तुमच्याबद्दल मी बोलणार नाही कारण इंग्रजीतली एक म्हण आठवली “Never wrestle with a pig because you’ll both get dirty and the pig likes it.”
गेल्या काही दिवसांपासून हे आरोप – प्रत्यारोप सुरु असतांना आता थेट दमानिया यांनी अजित पवार यांना चॅलेंज दिले आहे.