रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंनिसचे श्री स्वामी समर्थ केंद्रास आव्हान; ‘चमत्कार सिद्ध करा व एकवीस लाख रुपये जिंका’

डिसेंबर 23, 2022 | 2:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
annasaheb more

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट खुले आव्हान दिले आहे. चमत्कार सिद्ध करा व एकवीस लाख रुपये जिंका, अशा स्वरुपाचे हे आव्हान आहे. कोणत्याही वयातील सज्ञान किंवा अज्ञान मुलांच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर ४४८२४९०२ हा अंक लिहिल्याने, त्यांच्यातील मोबाईलचे व्यसन दूर होते, असा दावा अण्णासाहेब मोरे यांनी केल्याचे अंनिसने म्हटले आहे. त्याचाच आधार घेत अंनिसचे हे आव्हान स्विकारावे, असे अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जात पंचायतीला मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि  अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. समीर शिंदे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अंनिसने अण्णासाहेब मोरे यांना पत्रही दिले आहे.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, आम्ही महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आव्हानपत्राद्वारे आपणांस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नम्र आव्हान देतो की, एका व्हिडिओ क्लिपमध्ये आपण असा दावा केला आहे की , ” मुलांमध्ये मोबाईलचे २४ तास व्यसन आहे. त्यांच्यासाठी ४४८२४९०२ हा नंबर आलेला आहे. हा अंक हिरव्या पेनने म्हणजेच हिरव्या शाईने कोणत्याही वयाच्या सज्ञान किंवा अज्ञान मुलाच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर तो मराठीतून लिहावा . हा अंक लिहिला की त्यांचे लक्ष योग्य दिशेला जाईल. ”
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असे म्हणणे आहे की, आपल्या ह्या अजब-अवैज्ञानिक दाव्यामुळे, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013’या कायद्यातील काही तरतुदींचे सर्रास उल्लंघन घडत आहे. कारण अंकांमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. हा अंक कोणत्याही वयाच्या मुलांच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर लिहावा. त्यातून चमत्कार घडेल आणि त्यांचे लक्ष योग्य दिशेला जाईल, असा आपला दावा आहे. असा अर्थ आपल्या ह्या दाव्यातून स्पष्ट होतो आहे.
भारतीय राज्यघटनेतील श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचा महाराष्ट्र अंनिस आदर करते. शिवाय कोणत्याही व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रीय उपायांचा, उपचारांचा अवलंब उपकारक ठरतो ,असाही अंनिसचा ठाम विश्वास आहे.

मात्र आपला हा अजब -अवैज्ञानिक दावा,लोकांना चमत्कारांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारा आहे. अशा अवैज्ञानिक आणि लोकांची दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या गोष्टींची जाहिरात आपण प्रसारमाध्यमांतून करीत आहात. आपल्या या तथाकथित चमत्कारांचा प्रचार,आणि प्रसार करून , लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा आपला हेतू आहे, हे स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे स्पष्ट व ठाम मत आहे. म्हणून आपण केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने, संघटनेने उपस्थित केलेल्या पुढील प्रश्नांची सिद्धता , वैज्ञानिक कसोट्या वापरून आणि संघटनेच्या आव्हान प्रक्रियेतील अटी, नियम, शर्तींचे पालन करून आपण आपला दावा सिद्ध करावा, असे जाहीर आव्हान आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आपणांस देत आहोत.

आपल्या दाव्याच्या अनुषंगाने आपणास सिद्ध करावे लागणारे काही प्रश्न , पुढील प्रमाणे :
१] मुलांमधील २४ तास असलेले मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी ४४८२४९०२ हा अंक आला आहे, असे आपण बोलताना म्हटलेले आहे.
तर मग हाच अंक का व कुठून आला आहे ,याचे उत्तर आपण द्यावे.
२] कोणत्याही वयाच्या सज्ञान किंवा अज्ञान मुलाच्या कपड्यावर किंवा सदऱ्यावर हाच अंक का लिहावा ? याचे उत्तर वैज्ञानिक कसोटी वापरून सिद्ध करावे.
३] ह्या अंकात अशी कोणती दैवी शक्ती आहे, चमत्कार आहे, की ज्याच्यामुळे त्या मुलाचे मोबाईलचे व्यसन दूर होऊन ,त्याचे लक्ष योग्य दिशेला जाईल ,हे आपण कोणत्या वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे सांगत आहात, त्याचा पडताळा द्यावा.
४] हा अंक हिरव्या पेनने म्हणजेच हिरव्या शाईनेच आणि मराठीतूनच लिहावा, असे आपण का व कोणत्या वैज्ञानिक कसोटीच्या आधारे सांगत आहात ? ते सिद्ध करावे.

प्रसार माध्यमातून फिरत असलेल्या आपल्या उपरोक्त दाव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वरील आव्हानात्मक प्रश्न आपणास जाहीरपणे आम्ही उपस्थित करीत आहोत. जर आपण आपला दावा सिद्ध केला तर महाराष्ट्र अंनिसने आव्हान सिद्ध करण्यासाठी ठेवलेली 21 लाखाची रक्कम पारितोषिक म्हणून आपण जिंकाल, असेही आम्ही आपल्याला आश्वासित करतो.

वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे आणि महाराष्ट्र अंनिसच्या आव्हानप्रक्रियेच्या अटी, शर्ती, नियमांचे पालन करून, ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता आपली आहे. म्हणून महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान आपण स्वीकारत असल्याचे लेखी पत्र आपण, ह्या लेटरहेडवर, वरच्या बाजूला असलेल्या संघटनेच्या कार्याध्यक्षांच्या पत्त्यावर पुढील दहा दिवसात ई-मेलने तसेच रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची तसदी घ्याल ,अशी अपेक्षा आहे. वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे आपण आपला सदर दावा सिद्ध करू शकत नसाल तर,” सदर दावा आम्ही सिद्ध करू शकत नाही त्यातून माघार घेतो,” असेही आपण लेखी पत्राद्वारे पुढील दहा दिवसात संघटनेला कळवावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रावर डॉ. टी. आर. गोराणे, (राज्य प्रधान सचिव) कृष्णा चांदगुडे, (राज्य कार्यवाह, जात पंचायतीला मूठमाती अभियान) आणि ॲड. समीर शिंदे (जिल्हा कार्याध्यक्ष, नाशिक जिल्हा) यांची स्वाक्षरी आहे.

Anis Open Challenge to Swami Samartha Kendra
Science Mobile Habit Childrens

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या पुष्पाची चर्चा; विभागीय महसूल आयुक्तांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडाचे खोड नेले चोरुन

Next Post

रखडलेले गृहप्रकल्प होणार पूर्ण; केंद्र सरकारच्या स्वामीह फंडातून अशी मिळणार आर्थिक मदत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20221223 WA0013 1

रखडलेले गृहप्रकल्प होणार पूर्ण; केंद्र सरकारच्या स्वामीह फंडातून अशी मिळणार आर्थिक मदत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011