India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रखडलेले गृहप्रकल्प होणार पूर्ण; केंद्र सरकारच्या स्वामीह फंडातून अशी मिळणार आर्थिक मदत

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘स्वामीह फंड ‘ हा केंद्र सरकारचा रियल इस्टेट प्रकल्पात मदत करण्यासाठीच उभारण्यात आलेला फंड असून त्याचे देशभरातील अनेक बांधकाम प्रकल्पांना मोठे सहकार्य लाभत आहे. या फंडातून अर्धवट राहिलेले गृहप्रकल्प तसेच अडचणीत आलेले आणि रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करता येऊ शकतात, असे प्रतिपादन स्वामीह फंडाचे चिफ फायनान्स ऑफिसर इरफान काझी यांनी केले. तसेच नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना काही अडचणी बांधकाम व्यावसायिक व विकासकांना कोणतीही अडचण आल्यास स्वामीह फंडातून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी प्रथम सत्रात आयोजित बांधकाम व्यवसायिक आणि विकासकांच्या परिसंवादात इरफान काझी बोलत होते.

यावेळी इरफान काझी यांनी सांगितले की, रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी आणि घर खरेदीदारांना अपार्टमेंटची वितरण सुनिश्चित करण्यासाठी वित्तपुरवठा करणे हा स्वामीह हा फंडाचा मुख्य उद्देश आहे. तसेच हा फंड रिअल इस्टेट क्षेत्रातील तरलता निर्माण करण्यात मदत करते आणि सिमेंट आणि स्टील सारख्या प्रमुख उद्योगांना चालना देतो. तसेच या फंडातून १२ टक्के व्याज दराने पैसे देण्यात येतात. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी जवळजवळ सर्व पैशांचे व्यवस्था यासाठी मिळते. गृह प्रकल्पाच्या एकूण खर्च पैकी कमीत कमी ३० टक्के खर्च झालेला असेल तर असा गृहप्रकल्प या फंडातील कर्ज मिळण्यासाठी योग्य ठरू शकतात, असेही काझी यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना काझी पुढे म्हणाले की, भारतात सुमारे साडेचार लाख युनीट प्रकल्प थांबलेले आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार युनीट प्रकल्पाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकल्पाला १५ कोटी पासून ४०० कोटी पर्यंत मदत स्वामी हा फंडातून करण्यात येते. नाशिकमधील आतापर्यंत चार ते पाच डेव्हलपर्स यांनी संपर्क साधला आहे. तसेच इतर विकासकांना काही अडचणी असल्यास त्यांनी स्वामी हा फंडासाठी अर्ज करावा, अशी आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे यांच्या हस्ते इरफान काझी विनीत चांडक अमित मकवाना आदींसह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अभय साखरे यांनी केले. याप्रसंगी राजन दर्यानी, नरेश कारडा, सुनील भायभंग, डी.जे. देसवाणी, विपुल नेरकर, मर्जीन पटेल, चेतन पटेल, रवींद्र पाटील, रवींद्र धनाईत,भाविक ठक्कर,प्रशांत पाटील, विपुल पोद्दार, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

Union Government Fund for Uncomplete Home Projects


Previous Post

अंनिसचे श्री स्वामी समर्थ केंद्रास आव्हान; ‘चमत्कार सिद्ध करा व एकवीस लाख रुपये जिंका’

Next Post

आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करा; …म्हणून आमदार फरांदेंनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

Next Post

आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करा; ...म्हणून आमदार फरांदेंनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group