मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कायम वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा यांच्याविरुद्ध एक कोटींची लाच दिल्याची तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीमध्ये फडणवीस यांनी अनिक्षाने त्यांच्याविरुद्ध कट रचून धमकावल्याचेही म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार,‘अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने स्वत: डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालण्याची विनंती केली होती. २७ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षा म्हणाली की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते.
त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवले. १६ फेब्रुवारीला रात्री ९.३० च्या दरम्यान अनिक्षाने फोन केला. तेव्हा सांगितले की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला रात्री ११.५५ ते १२.१५ च्या दरम्यान २२ व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले. १९ फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांच्या मोबाइल क्रमाकांवर ४० मेसेज, व्हिडीओ, व्हॉइसनोट्स आणि स्क्रीनशॉट्स पाठवण्यात आले. हा नंबर अनिक्षाच्या वडिलांचा असल्याची माहिती मिळाली.’
अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा
मलबार हिल पोलिसांनी फडणवीस यांच्या तक्रारीवूरन अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Amruta Fadnavis Complaint 1 Crore Bribe