India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या जिल्ह्यात येणार अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक

India Darpan by India Darpan
January 18, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

दावोस (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी करणार आहे. त्यामाध्यमातून १५ हजार रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प करण्यात येणार आहे. ५ एमएमटीपीए (मिलियन मेट्रीक टन्स् पर ॲनम) क्षमतेचा हा कोल गॅसीफिकेशनचा प्रकल्प आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोल गॅसीफिकेशन ही काळाची गरज असून कोल गॅसीफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे सिंथेसीस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे भारतातील कार्कारी संचालक बाळासाहेब दराडे, गोपी लटरटे, निहीत अग्रवाल, अजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

#दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार. भद्रावती येथे २० हजार कोटी रू.गुंतवणुकीचा कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीनेही केला सामंजस्य करार. pic.twitter.com/tH8T9YvpTJ

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2023

American Company 20 Thousand Crore Investment
Chandrapur


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केला हा व्हिडिओ

Next Post

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केला हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group