India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चमत्कारच! दीड वर्षांचा चिमुरडा… साबणाच्या पाण्याने भरलेल्या वॉशिंग मशिनमध्ये पडला… १५ मिनिटे त्यातच होता… तरीही बचावला… कसं काय

India Darpan by India Darpan
February 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असं म्हणतात की दैव बलवत्तर असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुर्कीच्या भूकंपामध्ये ढिगाऱ्याखाली दडलेले आणि तब्बल २ ते ३ दिवसांनंतर काही बालक सुखरुप बाहेर पडताना दिसत आहेत. आता राजधानी दिल्लीतही अशीच एक चमत्कारी घटना घडली आहे. अवघ्या दीड वर्षांचा चिमुरडा वॉशिंग मशिनमध्ये पडला. तेव्हा मशिन साबणाच्या पाण्याने भरलेले होते. विशेष म्हणजे तो १५ मिनिटे त्यातच होता. तरीही तो बचावला आहे. याची देशभरातच चर्चा होत आहे.

आईच्या म्हणण्यानुसार, मुल वरच्या लोडिंग वॉशिंग मशिनमधील साबणाच्या पाण्यात झाकण उघडून सुमारे १५ मिनिटे बसले. मूल पडण्याच्या काही मिनिटांपूर्वी आई खोलीतून बाहेर गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा मूल कुठेच सापडले नाही. मुल खुर्चीसह मशीनवर चढले होते आणि कदाचित पुन्हा त्यात पडले.

मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याला आणले तेव्हा तो बेशुद्ध होता, थंड होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. एवढेच नाही तर त्याचे शरीर निळे झाले होते, हृदयाचे ठोके मंद झाले होते आणि बीपी किंवा नाडी याची कुठलेही नोंद होत नव्हती. मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मूल १५ मिनिटांपेक्षा कमी काळ मशीनमध्ये होते, अन्यथा तो वाचला नसता.

बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, मुलाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती खूपच वाईट होती. साबणाच्या पाण्यामुळे त्याचे अनेक अवयव काम करणे बंद झाले होते. तर अनेकांचे काम खराब झाले होते. त्याला रासायनिक न्यूमोनिया देखील झाला होता. ज्यामध्ये फुफ्फुसात जळजळ होते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्यांला बॅक्टेरियाचा न्यूमोनियाही झाला. यानंतर त्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनही झालं होतं.

मुलाच्या उपचारासाठी आवश्यक अँटीबायोटिक्स आणि फ्लुइड सपोर्ट देण्यात आला, त्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. हळूहळू तो त्याच्या आईला ओळखू लागला मग त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. तो सात दिवस मुलांच्या आयसीयूमध्ये राहिला, त्यानंतर त्याला १२ दिवस राहिलेल्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मुलाच्या मेंदूचे सीटी स्कॅनही करण्यात आले असून त्यात कुठलीही समस्या आढळलेली नाही. वसंत कुंज येथील फोर्टिस रुग्णालयात त्याने उपचार घेतले. हा चिमुरडा सात दिवस कोमा आणि व्हेंटिलेटरवर राहिला. त्यानंतर १२ दिवस जनरल वॉर्डमध्ये राहिला. आणि आता त्याला घरी सोडण्यात आले आहे. आता बाळाची प्रकृती उत्तम आहे.

Amazing Small Child Save after fallen in Washing Machine Soap Water


Previous Post

सीबीआयची कस्टम अधिकाऱ्यावर कारवाई प्रवाशाकडून असे उकळत होता पैसे

Next Post

अरेरे! कर्ज फेडू शकत नसल्याने पोटच्या मुलीलाच विकले… मुंबई हायकोर्ट त्या मातेला म्हणाले…

Next Post

अरेरे! कर्ज फेडू शकत नसल्याने पोटच्या मुलीलाच विकले... मुंबई हायकोर्ट त्या मातेला म्हणाले...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group