माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज आहे. गुरुवार (दि.१६ ते शनिवार दि. १८ मार्चपर्यन्त (३ दिवस) संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजा, वारा, गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता अधिक वाढली आहे. विशेषतः पावसाच्या तीव्रतेची निश्चिती दि. १६ व १७ मार्च (गुरु-शुक्र) रोजी दोन दिवस मुंबई, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भात अधिक आहे. तर मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात मध्यमच शक्यता जाणवते.
गारपीटीचा अंदाज
मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील खालील भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जाणवते.
विदर्भ
– गुरुवार व शुक्रवार (१६ व १७ मार्च) ३ दिवस
-विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात शक्यता अधिक
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1636221162739859457?s=20
मराठवाडा –
आज मंगळवार दि.१४ ते गुरुवार, १६ मार्च
विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शक्यता अधिक
मध्य महाराष्ट्र –
आज मंगळवार दि.१४ ते गुरुवार, १६ मार्च,
विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक जिल्ह्यात शक्यता अधिक
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1636217014766149633?s=20
शेतपिकांची काळजी
काढणीत आलेले कांदा, गहू पिके काढून झाक-पाक केल्यास सुरक्षित होतील. तर काढणीस अवकाश असलेल्या पिकांच्या वरील तारखांच्या अगोदर किंवा नंतर काढणी केल्यास नुकसानीचा तुलनात्मक अंदाज करून शेतकऱ्यांनी काढणीचा निर्णय घ्यावा.
आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा आणि वारासहित किरकोळ पावसाच्या शक्यतेबरोबरच मध्य महाराष्ट्र(नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात( औ. बाद ते नांदेड पर्यन्त ) आज गारपीटीची शक्यता जाणवते, तर विदर्भात मात्र आजच्या बरोबर उद्याही गारपीट होवु शकते.
सध्य:स्थितीत व्यापक प्रणालीमुळे सध्याचे पावसाळी ढगाळ वातावरण निवळणी( स्वच्छ होणे)साठी अजुनही ५ दिवस लागण्याची शक्यता जाणवते. कदाचित मंगळवार दि.२१ मार्च पासुन वातावरण निवळेल, असे वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रात येते काही दिवस दिवसाचे दुपारच्या कमाल तापमानात दोन डिग्रीने घसरण होण्याची शक्यता जाणवते, व ही स्थिती पुढील ५ दिवस राहण्याची शक्यता जाणवते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1636018853774802949?s=20
यामुळे होणार पाऊस, गारपीट
समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी उंचीवर असणारा व देशाचा ४०% असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करणारा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’. त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडेचा आस. तसेच बंगालच्या उपसागराहून आग्नेयकडून घुसणारे आर्द्रतायुक्त पण ‘आसा’ ला घासून गुरुवार १६ मार्च ला वाहणारे वारे. यांचा परस्पर मिलाफ होणार आहे. या क्रियेतून घडणारी वातावरणीय प्रणाली म्हणजे पावसासाठी पोषक आहे. सध्या लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. हे वारे महाराष्ट्राच्या मध्यावर घड्याळ काटा दिशेने चक्रकार पद्धतीने वाहणार असल्यामुळे हे घडून येणार आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1635640654796582912?s=20
Alert Unseasonal Rainfall Hailstorm Forecast Climate Weather