India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सावधान! मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज

India Darpan by India Darpan
December 9, 2022
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावत असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिले आहे. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास ते ८५ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे. आयएमडीने आपल्या पाच दिवसांच्या जिल्ह्याच्या अंदाजात म्हटले आहे की १२ डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याबाबत ठाण्याच्या तज्ञांनी सांगितले की, या पावसाचे कारण चक्रीवादळ आहे.

Rainfall very likely over parts of Maharashtra during during next 4-5 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्यI pic.twitter.com/zgj8BFv0aW

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 9, 2022

महाराष्ट्रात पडू शकतो पाऊस..
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ ते १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे. त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

SCS Mandous ovr SW BoB (Cyclone Warning for north TN,Puducherry, South AP coast):🔶Orange Msg.
Is 270km SSE of Chennai.
Very likly to weaken to CS nxt 3hrs.
Cross betn Puduchery & Sriharikota arnd Mahabalipuram as CS,max winds 65-75,gusting 85kmph 9Dec,midnight- early hrs 10Dec. pic.twitter.com/g8yrblF4K6

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 9, 2022

Alert Mandous Cyclone Maharashtra Rainfall Forecast
Unseasonal Rain Climate Weather IMD


Previous Post

रेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

Next Post

रूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा

Next Post

रूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group