पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात धुमाकूळ घालणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा अद्यापही शमण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवसांसाठी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस सतर्कतेचे आहेत.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसात कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, १२ ते १४ एप्रिल या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होण्याची चिन्हे आहेत. अधिक माहितीसाठी हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाज आणि इशारे यांच्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीने हिरावून घेतला आहे. १३ एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, १४ एप्रिल रोजी सुद्धा गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी मात्र पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने इशारा दिला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1646065417905897474?s=20
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1646072057212334080?s=20
Alert IMD Unseasonal Rainfall Hailstorm Weather Forecast