India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली का? भाजपसोबत जाणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं…

India Darpan by India Darpan
April 12, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली का, अंजली दमानिया यांनी ट्विट केल्यानुसार, आपण भाजपसोबत जाणार का याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

गारपीठीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीठ जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे.या संदर्भात आज भेट घेतली असे अजित पवार यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का अशी वक्तव्य करतात. त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर निर्माण होवू शकते. पण त्या गोष्टी मिडियापर्यंत जाण्याऐवजी त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उध्दव ठाकरे यांच्याशी बोलावे. यातून मार्ग निघू शकतो ना. टाळी एका बाजूने वाजत नाही ना. अशाप्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रात काम करणारा जो कार्यकर्ता आहे (त्या- त्या पक्षाचा) तोही संभ्रमात पडतो. त्यामुळे अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळी या गोष्टी मांडणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

कॉंग्रेस अंतर्गत जो विषय त्यासंदर्भात मी बोलू इच्छित नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी – त्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आपापल्या स्तरावर सोडवावे. आम्हाला सुचना करण्याचा अधिकार नाही आणि नाक खुपसायचाही अधिकार नाही. मात्र आघाडी टिकावी असे वाटते असेही मत अजित पवार यांनी मांडले.

कुणामुळे कुणाच्या जीवाला धोका असेल आणि ज्याने तक्रार दिली असेल तर सरकारने संरक्षण दिले पाहिजे. गंभीर असेल तर स्टेनगनधारी संरक्षण दिले पाहिजे.तुम्हाला तरी वाटते का ?की ,माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा व सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा, असा माणूस आहे असे अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार अशा शब्दात अजित पवार यांनी अंजली दमानिया यांच्या ट्वीटवर भाष्य केले.

Politics NCP Leader Ajit Pawar on Clean Chit BJP Alliance


Previous Post

अरे देवा! पुढील ५ दिवसही संकटाचे; वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीचा इशारा

Next Post

नाशकात खासगी सावकाराची मुजोरी! कर्जदाराच्या घरात शिरून जीवे मारण्याची धमकी; गोविंदनगरमधील घटना

Next Post

नाशकात खासगी सावकाराची मुजोरी! कर्जदाराच्या घरात शिरून जीवे मारण्याची धमकी; गोविंदनगरमधील घटना

ताज्या बातम्या

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023

त्र्यंबकेश्वर येथे ४४ वर्षानंतर एकत्र आले दहावीचे वर्गमित्र

May 28, 2023

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

May 28, 2023

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group