बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सावधान! पुढील आठवड्यात मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा उच्चांक; तज्ज्ञांचा इशारा

जानेवारी 14, 2022 | 11:37 am
in मुख्य बातमी
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आगामी काळात जाहीर सभा- चौक सभा, बैठका, प्रचार यात्रा, आदींना जोर येणार आहे. परंतु दुसरीकडे देशभरात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची वाढतांना दिसून येत आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे येत्या काही दिवसात देशभरातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विशेषत: नवी दिल्ली, मुंबई, कानपुर, लखनऊ, चंदीगड, भोपाळ, कोलकत्ता अहमदाबाद, पुणे, ठाणे, हैद्राबाद, चेन्नई, पणजी, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये हा धोका मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी आप आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. देशातील संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असताना, तज्ज्ञांनी पुढील आठवड्यापर्यंत दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये कोरोना प्रकरणांचा उच्चांक वर्तवला आहे. सध्या गेल्या वर्षी मे महिन्यानंतर देशात संसर्ग झपाट्याने पसरत आहे. गुरुवारी देशात 2.47 लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे.

महिनाभरापूर्वी दररोज येणाऱ्या प्रकरणांच्या तुलनेत ही संख्या दहापट आहे. ओमिक्रॉन प्रकार वेगाने डेल्टाची जागा घेत आहे. देशात आतापर्यंत 3.62 कोटी संक्रमित झाले आहेत. संसर्गाच्या बाबतीत भारत सध्या अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषता आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना संक्रमण वाढणार असून ओमिकॉनचा धोका अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ म्हणाले की, आमचे अभ्यास मॉडेल आणि इतरांचे संशोधन असे सुचवते की, भारतातील प्रमुख भारतीय शहरांमध्ये 20 जानेवारीच्या आसपास कोरोना बाधितांचा आकडा शिखरावर असू शकेल. तर संपूर्ण भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला बाधितांचे प्रमाण सर्वोच्च दिसून येईल. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या शुक्रवारी संसर्गाची सर्वाधिक सुमारे 21 हजार नवे बाधित आढळून आले आहेत. परंतु गेल्या काही दिवासांपासून मुंबईत रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोविड रुग्णालयांमध्ये जवळपास 80 टक्के खाटा रिक्त आहेत.

दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे 28,867 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 22,121 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी आशा व्यक्त केली आहे की येत्या काही दिवसांत येथे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. मोदी म्हणाले की, ओमिक्रॉन पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत आहे, ते जास्त संक्रमणक्षम आहे. आमचे आरोग्य तज्ज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. साहजिकच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post

जबरदस्त ऑफर! जुनी सायकल द्या आणि मिळवा नवी इलेक्ट्रिक सायकल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post

जबरदस्त ऑफर! जुनी सायकल द्या आणि मिळवा नवी इलेक्ट्रिक सायकल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011