पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – AIIMS म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधील गट A पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, AIIMS रायपूर मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मेडीकल मधील उच्च पदवी प्राप्त विद्यार्थी उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशील तपासावा. मेडीकलच्या या पदासाठी पगार सुमारे 67 हजार पर्यंत असेल. तसेच काही काळानंतर वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध होतील.
या भरती प्रक्रियेद्वारे सन 2022साठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) वरिष्ठ निवासी पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 5 पासून ते 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत aiimsraipur.edu.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 132 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात दि. 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे, मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात एमडी/एमएस/डीएनबी/डिप्लोमा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षे असावे, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. या पदावरील निवड झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये वेतन दिले जाईल. मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार वरील नमूद केलेल्या पदांसाठी दि. 5 ते 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकतात. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA देय असणार नाही. सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि SC/ST उमेदवारांसाठी 800 रुपये आहे.