India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; यावर असेल पूर्णपणे बंदी

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in स्थानिक बातम्या
0

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 29 जानेवारी, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी, व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुज्ञेय राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahmednagar District Collector Order Restrictions


Previous Post

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Next Post

नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? अजित पवार म्हणाले…

Next Post

नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? अजित पवार म्हणाले...

ताज्या बातम्या

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना, तत्काळ येथे पाठवा

February 3, 2023

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

February 3, 2023

भाजपची निवडणूक तयारी सुरू; राज्यभरात प्रवक्त्यांची अशी आहे तगडी फौज (बघा संपूर्ण यादी)

February 3, 2023

राज्यातील सर्व बाल सुधारगृहात सुरू होणार हे केंद्र; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – संकटांपासून हे तुमचे रक्षण करतात

February 3, 2023

सिन्नर – पुणे महामार्गावर ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाचा खून

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group