India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सन 2023 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. विश्व आदिवासी दिवस बुधवार 9 ऑगस्ट,2023, धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर,2023 तसेच दिवाळीचा दुसरा दिवस सोमवार 13 नोव्हेंबर,2023 असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या अशा
महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे. बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.

Nandurbar District Public Holiday Collector Order


Previous Post

महिलेच्या गळयातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीस्वाराने केली लंपास

Next Post

अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; यावर असेल पूर्णपणे बंदी

Next Post

अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; यावर असेल पूर्णपणे बंदी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group