India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल इतक्या लाख नागरिकांचे आधार अपडेटच नाही

जिल्ह्यातील आधार धारकांनी आधार अद्यावतीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in राज्य
0

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या आधार नोंदणी व अद्यतन विनीयम, 2022 नुसार ज्या आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार धारकांची आधार माहिती अद्यावत करणे बाकी असल्याने नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या सद्यस्थितीतील अहवालानुसार अहमदनगर जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार धारकांची आधार माहिती अद्यावत (Document Update) करणे बाकी आहे. नागरिकांना आधार माहितीचे अद्यावतीकरण करण्यासाठी आपल्या नजीकच्या आधार केंद्रांमध्ये समक्ष जाऊन अद्यावतीकरण करता येईल. अथवा नागरिकांना स्वतः myAadhaar Portal द्वारे माहितीचे Online अद्यावतीकरण करता येईल..

जे आधार धारक माहिती अद्यावतीकरण (Document Updation) हे myAadhaar Portal https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटद्वारे करतील त्यांना दि. 15 मार्च 14 जुन, 2023 या तीन महिन्यांसाठी अद्यावतीकरण मोफत राहील.
अहमदनगर जिल्हयातील सर्व नागरिकांनी वरील दोन पर्यायांद्वारे आपल्या आधार माहितीचे अद्यावतीकरण तातडीने करुन घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


Previous Post

अंतर्नाद, महावादन, महारांगोळी, शस्त्र प्रदर्शन, शस्त्र कलांचे सादरीकरण… गुढीपाडव्यानिमित्त नाशकात भरगच्च कार्यक्रम

Next Post

राहुरी, राहता येथे जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे निर्देश

Next Post

राहुरी, राहता येथे जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group