शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विमा न भरता शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत; तुम्हालाही मिळू शकतो असा लाभ, फक्त हे करा

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2023 | 5:09 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतर्गंत कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात २०२२ मध्ये ५३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर २०२३ मधील ३९ प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.

कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात संगमनेर, अकोले, कोपरगांव व राहाता या तालुक्यांचा समावेश होतो. शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरवतो, तर काही वेळा दिव्यांगत्व स्वीकारावे लागते. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी शासनाच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राबविली जाते.

या योजनेत २०२२ मध्ये संगमनेर -१९, अकोले -१२ , कोपरगांव – १० व राहाता -१२ असे एकूण ५३ प्रस्तावास मंजूरी मिळाली असून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयास विमा रक्कम ही देण्यात आली आहे. २०२३ साठी संगमनेर मधून १८, अकोले – ११, कोपरगांव -१ , राहाता मधून ९ प्रस्ताव अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

असा दिला जातो विम्याचा लाभ
 २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता. परंतु, या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली. जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल. शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख, शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाईल. अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.

लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता
महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यामध्ये आई, वडील, लाभार्थ्याचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे । वयोगटातील एकूण दोन जणांना लाभ घेता येईल.

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा विमा उतरवणे शक्य होत नाही. अशा वेळी शेतात काम करताना अपघात झाल्यास त्याला इलाज करण्यासाठी पैसे नसल्याकारणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासर्व पार्श्वभूमीवर सदरच्या योजनेचा शेतकरी बांधवांनी जरूर लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.बोराळे यांनी केले आहे.

Agriculture Crop Insurance Farmer Help Scheme

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व सरकारी दवाखाने होणार चकाचक; आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर यंत्रणा कामाला

Next Post

शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? हे स्टॉक्स नक्की घ्या.. फायद्यात रहाल..

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
bse share market

शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? हे स्टॉक्स नक्की घ्या.. फायद्यात रहाल..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011