रविवार, ऑगस्ट 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ममता बॅनर्जींच्या आणखी एका आमदाराला ईडीकडून अटक

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2022 | 12:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
mamata

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास ईडीने तीव्र केला आहे. याअंतर्गतच तृणमूल काँग्रेसचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी मंत्री पार्थ चॅटर्जी यांनाही अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

माणिक भट्टाचार्य हे पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. या वर्षी जूनमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप होता, त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आणि तेथेही आदेश देण्यात आले.

या प्रकरणी ईडीने अटक केलेले माणिक भट्टाचार्य हे तृणमूलचे दुसरे आमदार आहेत. यापूर्वी पार्थ चॅटर्जी यांना जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. ते तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते, पण त्यांना घेरल्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांना पक्ष आणि मंत्रिपदावरून बाहेरचा रस्ता दाखवला. पार्थ चॅटर्जींची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या दोन फ्लॅटमधून ईडीने ५० कोटींहून अधिक रुपये जप्त केले होते. माणिक भट्टाचार्य यांनी सीबीआयसमोर हजर राहावे, असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथून त्यांना दिलासा मिळाला. पुढील निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भट्टाचार्य यांना न्यायालयाकडून मिळालेला दिलासा सीबीआयबाबत होता. पण ईडी ही स्वतंत्र एजन्सी आहे. या प्रकरणी ईडी स्वतंत्रपणे तपास करत असून आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणांवर त्यांची स्वतःची नजर आहे. याशिवाय अन्य प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. आज माणिक यांना ईडीच्या वतीने पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या वर्षी मे महिन्यात कलकत्ता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय या प्रकरणात ईडीचाही समावेश आहे. या प्रकरणातील पहिले आरोपपत्र ईडीने सप्टेंबरमध्ये दाखल केले होते.

Again one TMC MLA Arrest by ED Mamta Banerjee
West Bengal School Recruitment Scam

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुक्त विद्यापीठात सुरू होणार नाट्यशास्त्र विषयाचा ॲडव्हान्स डिप्लोमा

Next Post

गांगुली नंतर हे होणार BCCIचे अध्यक्ष; भाजप नेते आशिष शेलार यांची या पदावर लागणार वर्णी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
BCCI

गांगुली नंतर हे होणार BCCIचे अध्यक्ष; भाजप नेते आशिष शेलार यांची या पदावर लागणार वर्णी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी गर्दीचे ठिकाणी टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, ३ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 2, 2025
Lodha1 1024x512 1

या अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

ऑगस्ट 2, 2025
rape

घरात कुणी नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 2, 2025
Untitled 1

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु; पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक

ऑगस्ट 2, 2025
crime112

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

ऑगस्ट 2, 2025
facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011