काबुल (अफगाणिस्तान) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांच्या अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याला परत बोलण्याच्या धोरणामुळे आता अफगाणिस्तान मध्ये हळूहळू तालिबानींचा कब्जा बसू लागला आहे. त्यामुळे मूळ देशातील असलेले ३०० सैनिक भीतीने देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा अफगाणिस्तानचा सुरक्षा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर बनला आहे.
अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानी अफगाण सुरक्षा दलांवर जोरदार हल्ला करत आहेत. तालिबान्यांनी जिल्ह्यांचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेण्याचा दावा केला आहे. विशेषत: तालिबान हे ईशान्य अफगाणिस्तानमध्ये दररोज अनेक जिल्हे त्याच्या नियंत्रणाखाली आणत आहेत. तालिबान लोकांना हाकलून दिल्यानंतर सुरक्षा दलाचे तीनशे सैनिक आपल्या देशाची सीमा पार करून अखेर ताजिकिस्तानला पोहोचले.
राष्ट्रीय सुरक्षा विषयावरील ताजिकिस्तानच्या राज्य समितीने म्हटले आहे की, हे सैनिक बदाखशान प्रांताच्या सीमेवरुन आले आहेत. आम्ही मानवतेमुळे त्यांना येथे प्रवेश दिला गेला. एप्रिलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याची घोषणा झाल्यापासून तालिबानी अफगाणिस्तान मध्ये स्थिर होत असून त्यांचा प्रभाव देशाच्या उत्तर भागात वेगाने वाढत आहे.









