India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई मिळणार; आतापर्यंत अनुदानापोटी इतके कोटी वितरित

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in राज्य
0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ३ हजार ३०० कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या ६ हजार ८०० कोटींपैकी ६ हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी ४ हजार ७०० कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास १२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


Previous Post

निमा बँक समिटचा समारोप; १८ हजारांहून अधिक लोकांची भेट, उद्योजकांच्या कर्जप्रकरणांचा मार्ग मोकळा

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – मातृभाषा

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - मातृभाषा

ताज्या बातम्या

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group