गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या

by India Darpan
ऑक्टोबर 16, 2022 | 4:52 pm
in मनोरंजन
0
FfL790maMAAwVis

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री वैशाली ठक्करने तिथे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. वैशाली ठक्करने प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेतही दिसली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की, पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. तेजाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली जवळपास एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती.

नुकताच तिने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘दिल जिगर नजर क्या है मैं तो तेरे लिए जान भी दे दूं’ गाताना दिसली. या व्हिडिओमध्ये ती हसत होती आणि आनंदी दिसत होती. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे.आता अचानक तिचा मृतदेह पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर जप्त करण्यात आलेल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ससुराल सिमर का मध्ये वैशाली ठक्करने अंजली भारद्वाजची भूमिका साकारली होती. ज्याला खूप प्रसिद्धीही मिळाली. याशिवाय सुपर सिस्टर्समध्ये शिवानी शर्मा, विश्व या अमृतमध्ये नेत्रा सिंह राठोड, मनमोहिनीमध्ये अनन्या मिश्रा यांची भूमिका तिने साकारली होती. वैशाली ठक्करने स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मधून टीव्ही पदार्पण केले. या मालिकेत तिने २०१५ ते २०१६ या काळात संजनाची भूमिका साकारली होती. ‘ये है आशिकी’मध्ये तिने वृंदाची भूमिका साकारली होती. वैशाली शेवटची टीव्ही शो रक्षाबंधनमध्ये कनक सिंह ठाकूरच्या भूमिकेत दिसली होती.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर रोका समारंभाचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तिने लग्न केल्याची माहिती दिली होती. तिने आपल्या भावी पतीचे नाव डॉ अभिनंदन सिंग असे ठेवले होते. कुटुंबातील काही अगदी जवळचे नातेवाईकच एंगेजमेंटला पोहोचले होते. अभिनंदन हे केनियामध्ये डेंटल सर्जन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एक महिन्यानंतर वैशालीने अभिनंदनसोबत लग्न होत नसल्याचे सर्वांना सांगितले. दोघांनीही आपलं लग्न रद्द केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रोका सेरेमनीचा व्हिडिओही डिलीट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

Actress Vaishali Thakkar Suicide in Indore
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोण म्हणतंय रुपया घसरतोय? अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या…

Next Post

येवल्यात धडपड मंचने बाजारपेठेत लावले ८ फुटाचे इको फ्रेन्डली आकाश कंदील

India Darpan

Next Post
20221016 161359

येवल्यात धडपड मंचने बाजारपेठेत लावले ८ फुटाचे इको फ्रेन्डली आकाश कंदील

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011