मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री उर्फी जावेदकडे व्हिडिओ सेक्सची मागणी करणारा व्यक्ती अखेर जेरबंद झाला आहे. त्याचे नाव ओबेद अफरिदी आहे. उर्फीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे.
उर्फीने सोशल मीडियात एक विस्तृत पोस्ट लिहिली होती. त्यात तिने सांगितले की, त्या व्यक्तीचा हेतू अश्लील होता. तसेच पोलिसांनी या प्रकरणात जी उदासीनता दाखवली त्याबाबत उर्फीने नाराजी व्यक्त केली. आपल्या हटके ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने ‘डर्टी डिमांड’ केली. संबंधित व्यक्तीच्या त्या अश्लील कृत्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी उर्फीने केली. तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारही दाखल केली. ‘डर्टी डिमांड’ करणाऱ्या व्यक्तीचा फोटो तसेच त्याने केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉटदेखील उर्फीने सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
संबंधित व्यक्ती एका फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून व्हिडीओ सेक्स करण्याची मागणी करीत असल्याचा आरोप उर्फीने केला. मात्र आपल्या तक्रारीला १४ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची नाराजी तिने व्यक्त केली होती. अखेर आरोपी जेरबंद झाला आहे. यानंतरच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खंत सर्वांसमोर मंडळी आहे. या भल्या मोठ्या पोस्टमधून तिने संबंधित व्यक्ती आणि निष्क्रिय पोलीस यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला आहे.
उर्फी म्हणते, दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने माझा फोटो अपलोड केला होता. त्याप्रकरणी मी पोलिसात तक्रार केली होती. संबंधित फोटोच्या माध्यमातून ती व्यक्ती मला सध्या ब्लॅकमेल करत आहे. तो फोटो दाखवून व्हिडिओ सेक्सची मागणी होत आहे. हा प्रकार समाजातील स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. याप्रकरणी मी गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरला १४ दिवस उलटून गेले आहेत, तरी पोलिसांनी माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी नाराजी उर्फीने व्यक्त केली होती.
आपण त्या व्यक्तीच्या मैत्रिणीच्या बहिणींशीही याबद्दल बोलल्याचे उर्फीने म्हटले आहे. पण त्याच्या बहिणींनीही हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. त्यांच्यासोबत पूर्वी मी काम केले आहे. संबंधित व्यक्ती पंजाब इंडस्ट्रीशी संबंधित असल्याचेही उर्फी सांगते. ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी बहुतेक वेळा तिच्या आउटफिटबद्दल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनताना दिसते.
Actress Urfi Javed Video Sex Demand Suspected Arrest