India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला डिलीट

India Darpan by India Darpan
February 7, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील सध्याचं हॉट सेन्सेशन म्हणजे उर्फी जावेद. कोणत्याही कारणाने का असेना पण सतत चर्चेतच राहणे उर्फीला आवडत असावे. त्यामुळेच ती नेहमी काही ना काही अतरंगी करून चर्चेत राहते. मध्यंतरी ती तिच्या विचित्र कपड्यांमुळे आणि त्यावरून राजकारणात रंगलेल्या वादामुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. आता निमित्त आहे ते एका व्हिडीओचे.

उर्फी तिच्या भन्नाट फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता पुन्हा एका प्रकरणाने उर्फी चर्चेचा भाग झाली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. एरवी अनेकदा नेटकरी तिची पाठराखण करत असतात. पण, या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी उर्फीला धारेवर धरले आहे. त्यामुळेच तिने हा व्हिडिओच डिलीट केल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ म्हणजे एक प्रॅन्क होता असे उर्फीचे म्हणणे होते. मात्र, नेटकऱ्यांच्या कमेंट्स बघून हा प्रॅन्क उर्फीच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे.

उर्फीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे हेअर स्टायलिस्ट, मेकअपमन काम करताना दिसत आहेत. तर एक मुलगी उर्फीची हेअरस्टाइल करत आहे. यावेळी उर्फीला कोणत्यातरी कारणावरून राग येतो आणि ती सरळ हेअर ड्रेसरच्या अंगावर पाणी ओतते. उर्फी म्हणते, “यांना सेटवर येऊन काय होतं? तुमचं डोकं ठिकाणावर नाही का? काम नसेल करायचं तर घरी जा, असंही ती सुनावते.
त्या मुलीच्या तोंडावर पाणी फेकल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला उर्फी जोरात हसू लागते. हा सगळा प्रँक आहे असं ती म्हणते. मात्र उर्फीची ही मस्ती नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. कमेंट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा उर्फीला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. त्यावर उर्फीने नेटकऱ्यांना देखील सुनावलं आहे.

आम्ही हे सगळं फक्त मस्तीमध्ये केलं. ज्या मुलीच्या चेहऱ्यावर मी पाणी फेकलं तिला याबाबत आधीच पूर्व कल्पना होती. मी तिच्या चेहऱ्यावर पाणी ओतणार हे तिला माहित होतं. तुम्ही सगळ्यांनी ओव्हर अॅक्टिंग करणं बंद करा.” असं उर्फीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होत. या व्हिडीओवरून नेटकाऱ्यानी उर्फीला निशाण्यावर घेतल्यावर उर्फीने आता हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया खात्यावरून हटवल्याचे दिसत आहे. एकंदर चित्रा वाघ प्रकरणी ठामपणे उभी राहिलेली उर्फी व्हिडिओच्या बाबतीत मात्र माघार घेताना दिसली आहे.

https://www.instagram.com/p/CoO5t0EPE1N/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=0f486913-f997-4398-b838-13b99024ee55

Actress Urfi Javed Troll Video Removed from Instagram


Previous Post

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

Next Post

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

Next Post

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group