India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

India Darpan by India Darpan
February 7, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ७०-८० च्या दशकात बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. असं जरी असलं तरी त्यांना नकारात्मक भूमिकांसाठीच जास्त ओळखलं जातं. अरुणा इराणी यांना आजवर दोनदा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका जरी असली तरी त्या भूमिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अरुणा यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही प्रचंड गाजल्या.

व्यावसायिक आयुष्यातील कामाबरोबरच अरुणा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. अरुणा यांनी विवाहित पुरुषाशी लग्न केलं. पण त्यांनी याबाबत कधीच खुलेपणाने भाष्य केलं नाही. आज बऱ्याच वर्षांनंतर अरुणा यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मन मोकळे केले आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अरुणा यांचं नाव अभिनेते महमूद यांच्याशी जोडलं गेलं. त्यावेळी महमूद यांचं आधीच लग्न झालं होतं. त्यानंतर अरुणा आणि दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अरुणा यांनी कुकू यांच्याशी लग्न केलं. पण कुकू यांचंही आधीच लग्न झालं होतं.

अरूणा इराणी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुषात खूप चढ -उतार पाहिले आहेत. ८० ते ९० च्या दशकातील अभिनेत्रींमध्ये अरुणा इराणी यांचे नाव अग्रस्थानी होतं. त्यांनी जवळपास ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अरुणा इराणी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

एका मुलाखतीमध्ये अरुणा म्हणतात, “जेव्हा तुम्ही लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेता तेव्हा सगळंच खूप कठीण असतं. माझं लग्न आधीच लग्न झालेल्या एका व्यक्तीबरोबर झालं आहे. मी लग्न केलं होतं. पण माझं लग्न झालं आहे हे कोणाला माहित नव्हतं. वर्षभरापूर्वी कुकूच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. म्हणूनच मी आता हिंमतीने याबाबत बोलत आहे.

‘मी आणि कुकू कोहली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होतो. कुकू कोहली यांचं आधीच लग्न झालं होतं, त्यांना दोन मुली देखील आहेत. परंतु, आम्ही भेटलो होतो त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं आहे, याबाबद्दल मला माहिती नसल्याचं अरुण सांगतात. नंतर मला ते आवडू लागले. पुढे आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यावेळी देखील त्यांचं लग्न झाल्याची माहिती मला नव्हती. त्यावेळी या विषयावर आम्ही बोलत देखील नव्हतो अशी आठवण अरूणा इराणी यांनी सांगितली.

याआधी मी कधीच याविषयी भाष्य केलं नाही. कारण मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. कुकू कोहलीबाबत मी पहिल्यांदा बोलत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला माहित होतं की मी कुकू कोहली यांच्याबरोबर आहे. पत्रकारांनाही ही गोष्ट माहित होती. एका स्त्रीसाठी विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणं सोप नसतं. माझं याआधी कोणतंच नातं नव्हतं. म्हणून मला मुलंही नाहीत.” अरुणा यांनी लग्नाच्या ३२ वर्षांनंतर खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

Actress Aruna Irani First Time Talk on Marriage


Previous Post

बाबो! २३ फ्लॅटची १२०० कोटीत विक्री; देशातील सर्वात महागडा व्यवहार… कुठे? आणि कुणी केला?

Next Post

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला डिलीट

Next Post

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले.... अखेर उर्फीने व्हिडिओच केला डिलीट

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

ज्वेलरी शोरूम चोरट्यांनी फोडले; २६ लाखाचे अलंकार केले लंपास

March 22, 2023

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group